Goa Hotel: 'माझी गर्लफ्रेंड हॉटेलच्या स्वच्छतागृहात गेली अन्....', गोव्यातील धक्कादायक अनुभव, पोस्ट Viral

Goa Viral News: माझी प्रेयसी हॉटेलमधील स्वच्छता गृहात गेली असता एक कर्मचारी खिडकीतून डोकावून बघत होता असा दावा तरुणाने केला आहे
Goa Viral Post
Goa Viral Post Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Hotel Incident: गोव्यातील हॉटेलमधील सुविधा आणि पर्यटकांची लूट हा मुद्दा चर्चेत असतानाच रेडीट या कंटेट शेअरिंग प्लाटफॉर्मवरील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. नागोवा येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या प्रेमी युगूलाला धक्कादायक अनुभव आला. 'माझी प्रेयसी हॉटेलमधील स्वच्छता गृहात गेली असता एक कर्मचारी खिडकीतून डोकावून बघत होता' असा दावा तरुणाने केला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही संबंधित तरुणाने म्हटले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे.

मुंबईत राहणारा तरुण आणि त्याची प्रेयसी 11 ते 14 जानेवारी या कालावधीत गोव्यातील नागोवामधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. 14 जानेवारीला सकाळी 11 वाजता चेक आऊट केले आणि रात्री नऊची गाडी असल्याने सामान हॉटेलमध्येच ठेवून म्हापसात जाण्याच ठरवले.

Goa Viral Post
Goa Tourism: थोडा है, थोडे की जरुरत है! गोव्याच्या पर्यटनावर कोल्हापुरच्या पर्यटकाने मांडले रोखठोक मत

हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी तरुण तळमजल्यावरील स्वच्छतागृहात गेला. काही वेळाने त्याची प्रेयसीही स्वच्छतागृहात गेली. तिथून परतल्यावर ती घाबरली होती, रडत होती, भीतीने थरथर कापत होती. तरुणाने विचारणा केली असता हॉटेलमधील एक कर्मचारी स्वच्छतागृहातील खिडकीमधून डोकावून बघत असल्याचे त्या तरुणीने सांगितले.

हा प्रकार तातडीने स्थानिक पोलिसांना कळवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोवा पोलिसांनी 24 तासानंतर FIR ची प्रत दिल्याचा दावाही तरुणाने केला आहे. या तरुणाची Reddit वरील पोस्ट व्हायरल झाली आहे. आता पुन्हा कधी गोव्यात जाणार नाही, असेही त्या तरुणाने म्हटले आहे. पोस्टवरील कमेंटमध्ये युजर्सनी घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. तर काही युजर्सनी पोस्टच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहे. या वृत्ताबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा मिळू शकला नाही. तर हॉटेल व्यवस्थापनानेही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हॉटेल मालकाने पैसे ऑफर केल्याचा आरोप

पोस्ट करणाऱ्या युजरने हॉटेल व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. हॉटेल मालकाने FIR मागे घेण्यासाठी पैसे ऑफर केले होते, असे तरुणाचे म्हणणे आहे. तसेच हॉटेलमधील 'कॉमन वॉशरुम'च्या आखणीही संशायस्पद असल्याचा उल्लेखही त्याने पोस्टमध्ये केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com