Honda Industrial Estate: वसाहत चार दशकांपूर्वीच स्थापन मात्र अजूनही वाहतूकीचे नियोजन नाही

अपघातांत वाढ : होंडा - वाळपई रस्त्याकडेला वाढली झुडपे
Honda Industrial Estate
Honda Industrial EstateDainik Gomantak
Published on
Updated on

Honda Industrial Estate होंडा औद्योगिक वसाहतीमधील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काल सायंकाळी साडेचारच्या दरम्यान दुचाकी व दहाचाकी अवजड वाहनाची टक्कर होऊन येथील नवनाथ मंदिरासमोर भीषण अपघात घडला, यामध्ये पाळी - वेळगे येथील तरुण ठार झाला.

त्यामुळे या औद्योगिक वसाहतीच्या जंक्शनवर निर्माण झालेल्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात स्थानिकांना विचारले असता, होंडा औद्योगिक प्रशासनाने या जंक्शनच्या ठिकाणी वाहतुकीसंदर्भातच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले.

होंडा औद्योगिक वसाहतीची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली. या ठिकाणी अनेक कंपन्या सुरू झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाला आर्थिक उत्पन्न प्राप्त होत आहे.

परंतु या औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या वाहनांमुळे सार्वजनिक रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच काल एका दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले असून आता तरी आयडीसी प्रशासन जागे होईल का असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे.

वेगमर्यादेवर हवे नियंत्रण

हा अपघात घडला त्या ठिकाणी जंक्शनवर एका बाजूने औद्योगिक वसाहतीमधील वाहने होंडा - वाळपई या प्रमुख रस्त्यावर येत असतात. उतरणीवरून अवजड वाहने खाली प्रमुख रस्त्यावर येतात, तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही.

त्याचप्रमाणे होंडा वाळपई रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा नियंत्रित करण्यासाठीही कोणतीही उपाययोजना सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने आखलेली नाही.

Honda Industrial Estate
National Service Scheme : ‘केशव स्मृती’च्या ‘एनएसएस’ शिबिराला कोलवाळ येथे प्रारंभ

गतिरोधक उभारण्याची गरज :

या जंक्शनवर औद्योगिक वसाहतीच्या परिसरात दोन्ही बाजूंनी झाडे झुडपे वाढल्याने होंडा - वाळपई दरम्यानच्या रस्त्यावरून ये - जा करणारी वाहने औद्योगिक वसाहतीतून खाली येणाऱ्या अवजड वाहनांच्या चालकांना दिसत नसल्याने येथे अपघात घडत आहेत.

त्याचप्रमाणे होंडा - वाळपई रस्त्यावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे. त्यासाठी औद्योगिक वसाहतीच्या प्रशासनाने येथे उपाययोजना आखली पाहिजे.

तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने होंडा - वाळपई दरम्यानच्या रस्त्यावर छोट्या स्वरूपाचे गतिरोधक दोन्ही बाजूंनी घालण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उद्योजक सुरेश देसाई यांनी व्यक्त केली.

Honda Industrial Estate
गोव्यात किशोरवयीन मुलांमध्ये वाढताहेत मानसिक आजारांच्या समस्या, कोरोनानंतर लक्षणीय वाढ

आपण गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांकडे चर्चा करणार असून या ठिकाणी भविष्यात कोणत्याही स्वरूपाचे अपघात घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

डॉ. दिव्या राणे, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com