गोव्यात किशोरवयीन मुलांमध्ये वाढताहेत मानसिक आजारांच्या समस्या, कोरोनानंतर लक्षणीय वाढ

किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आजारांची समस्या दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे.
Mental Health
Mental HealthDainik Gomantak
Published on
Updated on

किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आजारांची समस्या दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. गोव्यात मागील काळात आरोग्याशी संबंधित वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी भेटींची संख्या वाढली आहे.

'किशोरवयीन मुलांना आता वृद्धांसोबत उच्च जोखीम गटात समाविष्ट केले जाऊ शकते. कोरोना साथीच्या आजारानंतर क्लिनिकला भेट देणाऱ्या किशोरवयीनांच्या संख्येत वाढ झाली आहे,' असे निरीक्षण उत्तर जिल्हा रुग्णालय, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. तन्वी पेडणेकर यांनी नोंदवले आहे.

पर्यटनाची दारे खुली झाल्यानंतर उत्तर गोवा अमली पदार्थांचा गैरवापर आणि वेश्याव्यवसायाचे केंद्र बनत गेला. त्यानंतर कॅसिनोचे आगमन झाले. पण, तरुणांमध्ये दिसणारा ताण पालकांसोबत गैरसंवादाशी संबधित आहे.

अनेक तरुण आमच्याकडे तणाव, चिंता आणि पालकांशी असलेल्या नात्यासंबंधित समस्या घेऊन येतात, असे डॉ. पेडणेकर सांगतात. डॉ. पेडणेकर आणि त्यांची टीम मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर काम करतात. आरोग्य सेवा संचालक (DHS) च्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे (PHC) विविध ठिकाणी दर महिन्याला भेट देतात.

Mental Health
Drug Nexus In Goa: संगीत पार्ट्या अमली पदार्थ तस्करीचे तळ; पोलिसांचे अभय, गोव्यासाठी धोक्याचा इशारा

मुलांना निर्णय घ्यायचा आहे पण, त्याची परवानगी मिळत नाही. मुले जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत. विशेष बाब म्हणजे त्यांना यातून बाहेर पडायचे असून, वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे डॉ. पेडणेकर सांगतात.

DMHP मधील मानसशास्त्रज्ञ दुर्गा चारी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना नंतर वैद्यकीय मदत मागणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. किशोरवयीन मुलांवर कोविडचा मानसिक प्रभाव अधिक झाला आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

DMHP टीम, पंचायत, NGO आणि शाळा समुपदेशकांमार्फत मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करत आहे. मानसिक आजार हा सामान्य आजार असून, त्याचा उपचार शक्य आहे.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य वेगवेगळे नाही. जर तुम्हाला शारीरिक आरोग्यासाठी औषधांची गरज असेल तर मानसिक आरोग्यासाठी देखील गरज आहे. 2017 च्या मानसिक आरोग्य कायद्यानुसार निर्णय घेण्याचे सर्व अधिकार रुग्णाला आहेत, असे पेडणेकर सांगतात.

मानसिक आरोग्याचे शिक्षण महत्वाची भूमिका बजावते. रूग्णाला आजाराची जाणीव करून देत, सोयीस्कर उपचार सुचवले जातात, असे त्या म्हणाल्या.

एक काळ असा होता जेव्हा आत्महत्येचे प्रमाण अधिक होते. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, याचा उपचार केला जाऊ शकतो मात्र याबाबत पुरेशी जनजागृती केली जात नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

- अगस्तो रॉड्रिग्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com