Goa Home Stay Policy: राज्यात लवकरच 100 होम स्टे; फर्निचरसाठीही 2 लाख रूपये देणार...

पर्यटन मंत्र्यांची घोषणा; होम स्टे आणि कॅराव्हॅन पॉलिसीची होणार अंमलबजावणी
Goa Home Stay and Caravan Policy
Goa Home Stay and Caravan PolicyDainik Gomantak

Goa Home Stay and Caravan Policy: गोव्यात शॅक पॉलिसी लागू केल्यानंतर कृषी धोरणाबाबत चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, मंगळवारी राज्य सरकारच्यावतीने होम स्टे आणि कॅराव्हॅन पॉलिसी जाहीर करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Goa Home Stay and Caravan Policy
Condolim Beach: दिल्लीच्या हुल्लडबाज पर्यटकाने थेट कांदोळी बीचवर घातली गाडी; पोलिसांनी घेतले ताब्यात
Dr. Chandrakant Shetye | Pramod Sawant | Rohan Khaunte
Dr. Chandrakant Shetye | Pramod Sawant | Rohan Khaunte Dainik Gomantak

या होम स्टे आणि कॅराव्हॅन धोरणानुसार राज्यभरात लवकरच 100 होम स्टे सुरू केले जातील. तसेच त्यामधील फर्निचर घेण्यासाठी दोन लाख रूपये आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

तसेच कॅराव्हॅन गाड्या पार्किंगसाठी काही जागादेखील आखून ठेवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, होम स्टे धोरणाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सांगे, केपे, धारबांदोडा, सत्तरी, डिचोली, काणकोण या तालुक्यांमध्ये होम स्टे धोरण लागू केले जाणार आहे. त्या अंतर्गत पर्यटकांना गोव्याचा ग्रामीण भाग, संस्कृती आणि इतर नवीन गोष्टी अनुभवता येतील, समजून घेता येतील.

दरम्यान, राज्यात बेकायदेशीररित्या अॅडव्हेंचर टुरिझम कुणी करत असेल तर त्यावर कारवाई करणार आहे. एखाद्या हॉटेल परिसरात जर कुणी टाऊट्स असे करताना आढळून आले तर संबंधित हॉटेलचा अबकारी परवाना रद्द केला जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com