Condolim Beach: दिल्लीच्या हुल्लडबाज पर्यटकाने थेट कांदोळी बीचवर घातली गाडी; पोलिसांनी घेतले ताब्यात

व्हिडिओ समाजमाध्यमांवर झाला होता व्हायरल
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून देशभरातून पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. काही पर्यटक हे हुल्लडबाजी करत गोव्यातील पर्यटनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात.

समुद्र किनाऱ्यांवर गाडी नेण्यास सक्त मनाई असतानाही असे प्रकार काहीवेळा समोर येत असतात.

आज, मंगळवारी देखील कांदोळी बीचवर असा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराचा व्हिडिओ दुपारपासूनच गोव्यातील समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता.

तसेच यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. यात एका काळ्या महिंद्रा थर ही गाडी कांदोळी बीचवर जाताना दिसत होती.

Goa Crime
Rani Rampal: हॉकी संघाची माजी कर्णधार चौथ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी; भारताकडून नोंदवलेत 120 गोल

ड्रायव्हर बेदरकारपणे गाडी चालवत होता. अखेर पोलिसांनी या व्हिडिओद्वारे तसेच गाडीच्या नंबरवरून माग काढून संबंधित गाडीच्या ड्रायव्हरला अटक केली.

तो दिल्लीचा पर्यटक असून त्याचे नाव लोकेश रवीकुमार बन्सल (वय 28 वर्षे) असे आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. बन्सल हा शालीमार बाग, दिल्ली येथील रहिवासी आहे.

त्याने काळ्या रंगाची महिंद्रा थर गाडी (GA-03-AH-5196) गोव्यातील रेंट अ कारमधून घेतली. मित्रांसोबत फिरताना ही गाडी त्याने थेट कांदोळी बीचावर नेली.

Goa Crime
Goa Crime: दाम्पत्याचा 100 हून अधिक जणांना 21 कोटींना गंडा; शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष

अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे तो वाहन चालवत होता, असे सांगण्यात आले. त्यातून त्याने तेथील उपस्थितांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा पोलिसांनी त्याच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

तसेच त्याने घेतलेली थर जीप देखील जप्त करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com