Goa Mandovi Pollution: मळा तलाव प्रदूषणानंतर आता मांडवी नदी न्यायालयाच्या रडारवर; कॅसिनो आणण्यापूर्वी कोर्टाची परवानगी अनिवार्य

Goa High Court Mandovi Pollution: नवीन कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत प्रवेश देण्यापूर्वी किंवा त्याचा परवाना हस्तांतरित करण्यापूर्वी सरकार आणि संबंधित कॅसिनो कंपनीने न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे आता अनिवार्य ठरणार आहे.
Goa Mandovi Pollution
Goa Mandovi PollutionDainiak Gomantak
Published on
Updated on

पणजी: नवीन कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत प्रवेश देण्यापूर्वी किंवा त्याचा परवाना हस्तांतरित करण्यापूर्वी सरकार आणि संबंधित कॅसिनो कंपनीने न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे आता अनिवार्य ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालया च्या गोवा खंडपीठाने यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले आहेत. सध्या संबंधित कॅसिनो जहाज मुरगाव बंदरात नांगरून ठेवण्यात आले आहे. त्यास आवश्यक असलेले ‘सर्टिफिकेट ऑफ सर्व्हेअर’ (अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र) अद्याप मिळाले नसल्याची बाब कंपनीने न्यायालयात मान्य केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार

अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याशिवाय पणजी महानगरपालिका, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, मलनि:स्‍सारण महामंडळ आणि आरोग्य खाते यांना संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सुनावणी १३ मे रोजी ठेवण्यात आली आहे. पर्यटन आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मांडवी नदीच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिक सतर्क राहून सखोल अभ्यास करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सध्या दर तीन महिन्यांनी होणारी तपासणी अपुरी ठरत असल्याचे निरीक्षणही यावेळी नोंदवण्यात आले.

Goa Mandovi Pollution
Sal river pollution: खारेबांध येथे नाल्याच्या मुखावरच झोपडपट्टी, साळ नदीत थेट मलमूत्र विसर्ग; अधिकाऱ्यांच्या पाहणीत धक्कादायक बाब उघड

नवा कॅसिनो येणार नाही

राज्‍य सरकार नव्‍या कॅसिनोला परवानगी देण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याबाबत संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो, कोणताही नवा कॅसिनो येणार नाही.

परवाना हस्तांतरणालाही मंजुरी बंधनकारक

पाण्याचे ऑडिट करण्याचा महत्त्‍वपूर्ण आदेश पाण्याचे ऑडिट करण्याचा महत्त्‍वपूर्ण आदेश

मळा -पणजी येथील तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा जनहित याचिकेची व्याप्ती वाढवली आहे. मांडवी नदीच्या प्रदूषणाचाही आता त्‍यात समावेश केला आहे. न्यायालयाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदीतील पाण्याच्या ‘क्वालिटी’ आणि ‘क्वांटिटी’चे सविस्तर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषतः ज्या भागात फ्लोटिंग कॅसिनो नौका नांगरलेल्या आहेत, त्या ठिकाणच्या पाण्याची तपासणी करून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कृती

Goa Mandovi Pollution
Sal River Pollution: गंभीर अवस्था! प्रदूषणामुळे 'साळ नदी'त प्राणवायूचे प्रमाण शून्य, कचरा-सांडपाण्यामुळे धोक्याची घंटा

नेमकी घटना काय?

१ गेल्‍या एप्रिल महिन्‍यात मळा तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळले होते. त्‍यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती.

२ प्राथमिक तपासणीत पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी केवळ ०.८ मि.ग्रॅ./लिटरपर्यंत घसरल्याचे समोर आले.

३ मासे जिवंत राहण्यासाठी किमान ४ मि.ग्रॅ./लिटर ऑक्सिजन आवश्यक असतो. सांडपाण्यामुळे झालेल्या ‘युट्रोफिकेशन’मुळे हा तुटवडा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.

४ घटनेनंतर दरवाजा उघडण्यात आला, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी तात्पुरती वाढली; मात्र हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

मळा-पणजी तलावात मृत्‍युमुखी पडलेले हजारो मासे आणि अगोदरच प्रदूषणाने बरबटलेल्‍या मांडवी नदीत येऊ घातलेले भले मोठे कॅसिनो जहाज, या दोन प्रश्‍‍नांवरून न्‍यायालयाने सरकारला धारेवर धरले आहे.प्रशासकीय अनास्थेवर हातोडा तलावातील माशांचा मृत्‍यू; मांडवीतील कॅसिनो प्रश्‍‍नावर उच्च न्यायालय गंभीर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cultural history of Juve island
Goa Mandovi River Casino Dispute
New Casino Vessel Permission
Mandovi River Casino PIL
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com