Goa Health: "वेलनेस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न!" आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

Vishwajeet Rane Goa: अर्बन डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत राज्यभर एकूण १५ वेलनेस सेंटर सुरू करण्यात आलेली असून टप्या-टप्प्याने त्याचे उद्घाटन केले जात आहे
Goa Wellness center
Goa Wellness center Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: अर्बन डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत राज्यभर एकूण १५ वेलनेस सेंटर सुरू करण्यात आलेली असून टप्या-टप्प्याने त्याचे उद्घाटन केले जात आहे. या सेंटरच्या माध्यमातून गरजू लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्गदर्शनाखाली काम सुरु असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी वेळूस वाळपई येथे सुरू करण्यात आलेल्या वेलनेस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले.

या कार्यक्रमात पर्ये मतदारसंघांच्या आमदार डॉ. देविया राणे, विनोद शिंदे, चेअरपर्सन प्रसन्ना गावस, उपनगराध्यक्ष रामदास शिरोडकर तशेच इतरांची उपस्थिती होती. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी फीत कापून वेलनेस सेंटरचे उद्घाटन केले. सध्या हे सेंटर केवळ दिवसा काम करत आहे मात्र लवकरच २४ तास रुग्णांना सेवा दिली जाईल. गोव्यात होंडा, साखळी, मोतीडोंगर अशा विविध ठिकाणी असे वेलनेस सेंटर्स तयार करण्यात आले आहेत आणि यांपैकीच एक वेलनेस सेंटर वाळपईमधील वेळूस या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.

येणाऱ्या काळात या वेलनेस सेंटरमधून २४ तास सेवा देण्यावर भर दिला जाईल. रात्री-अपरात्री जर का एखादा रुग्णाला मदतीची आवश्यता भासल्यास डॉक्टर त्याच्या सेवेसाठी तत्पर असतील.

Goa Wellness center
Vishwajeet Rane: रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकांची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार सामान्य जनतेला मदत मिळावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमात लोकांना रक्ततपासणी पासून ते इतर सर्व सुविधा दिल्या जातील असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com