Goa Health Centers: राज्यातील आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणार; 2050 पर्यंत 50 टक्के ‘राष्ट्रीय गुणवत्ते’चे सरकारचे लक्ष्य

Goa Healthcare: राज्यातील आरोग्य केंद्रांना प्रथम राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणित करणे व नंतर त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणित करणे आवश्यक आहे.
Goa Health Centers: राज्यातील आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणार; 2050 पर्यंत 50 टक्के ‘राष्ट्रीय गुणवत्ते’चे सरकारचे लक्ष्य
Valpoi Health CenterDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: राज्यातील आरोग्य केंद्रांना प्रथम राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणित करणे व नंतर त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणित करणे आवश्यक आहे. आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य केंद्रे गुणवत्ता प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०२५ पर्यंत ५० टक्के आरोग्य केंद्रे राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट आहे.

धारबांदोडा व इतर काही आरोग्य केंद्रे खाटांची आहेत तर दक्षिण गोव्यात लोटली, नावेली, चिंचोणे व कुठ्ठाळी आरोग्य केंद्रांत खाटांची व्यवस्था नाही. अजूनपर्यंत १७ आरोग्य केंद्रे राष्ट्रीय प्रमाणित म्हणजेच राष्ट्रीय गुणवत्ता हमी पात्र आहेत. त्यामुळे ५० टक्के उद्दिष्ट गाठणे हे एक मोठे आव्हान असेल असे मानले जाते. जी आरोग्य केंद्रे राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणित झाली आहेत, त्यात म्हापसा (Mapusa), फातोर्डा, वाळपई, साखळी, नावेली, चिंचोणे यांचा समावेश आहे.

Goa Health Centers: राज्यातील आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणार; 2050 पर्यंत 50 टक्के ‘राष्ट्रीय गुणवत्ते’चे सरकारचे लक्ष्य
Bicholim Health Center : डिचोली आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव ; रुग्णांची गैरसोय

आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविणे हे राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणित करण्यामागे सार्वजनिक आरोग्य सेवेतील दर्जा वाढविण्यास महत्वपूर्ण आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य व कटुंब कल्याण मंत्रालयाने विविध मार्गदर्शक अटी व नियम घालून दिले आहेत. यापूर्वी गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी केवळ जिल्हा इस्पितळे पात्र होती. आता ही प्रमाणपत्र प्रक्रिया प्राथमिक, उपआरोग्य केंद्रांना, समुदाय आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे (नागरी प्राथमिक केंद्रे) यांनाही लागू करण्यात आली आहे.

आर्थिक निधीही उपलब्ध

जी आरोग्य केंद्रे राष्ट्रीय गुणवत्ता हमी प्रमाणित दर्जा प्राप्त करतात त्यांना गुणवत्ता मानक टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचप्रमाणे क्षमता निर्माण करण्यासाठी आरोग्यसेवेचे काम करणाऱ्यांना सहकार्य दिले जाते. त्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्रे दिली जातात.

तसेच राष्ट्रीय गुणवत्ता दर्जा प्राप्त करण्यासाठी आर्थिक निधीही उपलब्ध केला जातो. त्याचप्रमाणे या सर्व्हे केंद्रांसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनकर्त्यांची नियुक्ती केली जाते. राज्य तसेच देशभरातील आरोग्य केंद्रांचे मूल्यांकन करण्यासाठी आर्थिक निधीही उपलब्ध केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com