Vishwajit Rane: कोविडचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; जनतेने घाबरण्याची गरज नाही...

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आवाहन; राज्यात कोविडचे 23 रूग्ण
Health Minister Vishwajit Rane
Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak

Vishwajit Rane: राज्यात कोविडचा एकही रुग्ण ऑक्सिजनवर किंवा इस्पितळात नाही. राज्यात असलेल्या 23 कोविड रुग्णांची लक्षणे ही सौम्य स्वरूपाची आहेत.

त्यामुळे इतर ठिकाणी कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही, असा निर्वाळा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशभरात कोविडचे रुग्ण वाढत असल्याकारणाने घ्यावयाची काळजी आणि याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत देशभरातील आरोग्यमंत्र्यांचे मत जाणून घेण्यासाठी आज (बुधवारी) आभासी पद्धतीने बैठक घेतली.

Health Minister Vishwajit Rane
Sanskrit in Goa Schools: गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये शिकवणार संस्कृत

या बैठकीनंतर राणे यांनी सांगितले की, कोविडचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणेची पूर्ण सज्जता आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच कोविडचा सामना करण्यासाठीचा सरावही पूर्ण केलेला आहे.

कोविडचा नवा विषाणू देशातील काही राज्यात आढळून आला असल्याकारणाने जिल्हा पातळीवरील इस्पितळात तशा चाचण्या सुरू करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.

राज्य सरकार आपल्या पातळीवर जनतेसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे सध्या जारी करणार नसून आजच्या बैठकीत केंद्र सरकारनेच याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे सुचवण्यात आले आहे.

कारण प्रत्येक राज्य आपल्या आपल्या परीने मार्गदर्शक तत्त्वे जारी करते आणि त्यातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्यांचा गोंधळ उडतो असा मुद्दा मांडण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Health Minister Vishwajit Rane
Goa Liberation Day: भारतीय सैन्यापुढे अवघ्या 36 तासांत पोर्तुगीजांनी टेकले गुडघे; कसे मिळाले गोव्याला स्वातंत्र्य? जाणून घ्या...

सर्दी झालेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नजीकच्या इस्पितळात जाऊन आपली कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले. केवळ अलगीकरणात राहिल्याने रुग्ण बरे होतात, असा आताचा अनुभव आहे. त्यामुळे कोणीही कोविडमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. यामुळे राज्य सरकार याबाबत विशेष काळजी घेत आहे.
- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com