मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, विश्‍‍वजीत आणि माझ्यात काेणतेही मतभेद नाहीत

पैकुळ येथील कार्यक्रमात अनेकांनी टवकारले कान : विरोधकांकडून नाहक दुफळी निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न!
CM Pramod sawant inaugurated Paikul Bridge
CM Pramod sawant inaugurated Paikul BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod sawant inaugurated Paikul Bridge : राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील संबंध चांगले नसल्याची चर्चा सुरू असते. त्यावर सोमवारी मुख्यमंत्री सावंत स्‍पष्‍टच बोलले. आम्‍हा दोघांमध्‍ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र विरोधक आमच्यात वाद आहेत अशी बतावणी करून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्‍यांनी केला.

सत्तरी तालुक्‍यातील पैकुळ पुलाचे उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याचा विकास हाच सरकारचा ध्यास आहे. माझ्यात आणि विश्वजीत राणे यांच्यात विरोधक मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.

CM Pramod sawant inaugurated Paikul Bridge
दूध पाजून आईने मुलाला खाली ठेवले अन् सात दिवसांच्या चिमुकल्याचा श्वास थांबला, माजोर्डा येथील दुर्दैवी घटना

परंतु आमच्‍यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही दोघेही राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हा दोघांचेही काम सुरू आहे. गोव्यासारख्या आरोग्यसुविधा इतर कोणत्याही राज्यात नाहीत, असेही ते म्हणाले.

दरम्‍यान, एकूण १२ कोटी रुपये खर्चून हा भव्य पूल अवघ्या नऊ महिन्यांत उभारण्यात आला आहे.

मुख्‍यमंत्री-आरोग्‍यमंत्री काय बोलणार, याचीच होती उत्‍सुकता

मुख्‍यमंत्री आणि आरोग्‍यमंत्री एकाच व्‍यासपीठावर येणार म्‍हणून या कार्यक्रमाला सत्तरीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोण काय बोलणार, याचीच प्रत्‍येकाला उत्‍सुकता लागून राहिली होती. या दोघांसह पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्‍या राणे व्‍यासपीठावर येताच उपस्‍थितांनी टाळ्‍यांचा एकच कडकडाट केला.

भलामोठा पुष्‍पहार घालून या तिघांचे स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी विश्‍‍वजीत राणे व माझ्‍यात कोणतेही मतभेद नसल्‍याचे सांगून विरोधकांच्‍या फुग्यातील हवाच काढून घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Political Reservation
Pramod Sawant ST Reservation
Pramod Sawant Nitin Nabin Meeting
Double Engine Government Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com