दूध पाजून आईने मुलाला खाली ठेवले अन् सात दिवसांच्या चिमुकल्याचा श्वास थांबला, माजोर्डा येथील दुर्दैवी घटना

मुलाला घेऊन पालकांनी तत्काळ दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात धाव घेतली मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Seven Days Child Died In Majorda Goa
Seven Days Child Died In Majorda GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सात दिवसांपूर्वीच घरात गोंडस मुलाचा जन्म झाला, घरात आनंदाचे वातावरण होते. पण, माजोर्डा येथे राहणाऱ्या मूळच्या उत्तरप्रदेशातील सरोज कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण टाकणारी एक दुर्दैवी घटना घडली. आईने सात दिवसांच्या मुलाला दूध पाजून नुकतेच खाली ठेवले आणि काही वेळातच त्याचा श्वास थांबला.

मुलाला घेऊन पालकांनी तत्काळ दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात धाव घेतली मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रणजीत व काजल सरोज हे मूळचे उत्तरप्रदेशातील जोडपे माजोर्डा येथे वास्तव्यास आहे. सात दिवसांपूर्वी काजल यांची प्रसुती होऊन त्यांना मुलगा झाला. प्रसुतीनंतर काजल यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला व त्या राहत्या घरी आल्या. रविवारी मुलाला थोडा ताप होता.

दरम्यान, दुपारच्या सुमारास काजल यांनी बाळाला दूध पाजून, खाली ठेवले. पण, खाली ठेवल्यानंतर बाळाची हालचाल होईना. घाबरलेल्या पालकांनी बाळाला दक्षिण जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Seven Days Child Died In Majorda Goa
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोलच्या दरात बदल, जाणून घ्या राज्यातील इंधनाचे ताजे भाव

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालकाची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. बालकाच्या श्वसननलिकेत दूध गेल्याने श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाला. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शवचिकित्सा अहवालानंतर बालकाचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबत कोलवा पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com