

पणज: सरकारी नोकरीत असतानाही गृहआधार योजनेचा लाभ घेतलेल्या ३०४ जणांकडून आतापर्यंत १.६० कोटींची वसुली महिला आणि बाल कल्याण खात्याने केल्याची माहिती संचालक ज्योती देसाई यांनी मंगळवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
गृह आधार योजनेअंतर्गत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दरमहा १,५०० रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येते. राज्य सरकारने २०१९ मध्ये योजनेत दुरुस्ती करीत ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत किंवा विवाहित महिलांचे पती नियमित सरकारी कर्मचारी आहेत, अशांना योजनेतून वगळण्यात आले.
तरीही अशा अनेक महिला योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून योजनेअंतर्गत घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी खात्याने काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यातून ज्या महिला स्वत: सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत, अशा तीन हजारपेक्षा महिला गृहआधारचा लाभ घेत असल्याचे उघड झाले.
त्यानंतर खात्याने त्यांच्याकडून योजनेअंतर्गत घेतलेले पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली. संबंधित लाभार्थींना दोनवेळा नोटीस पाठवून त्यांच्या किंवा त्यांच्या जोडीदाराच्या रोजगाराच्या स्थितीची पडताळणी करणारी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. आवश्यक कागदपत्रांमध्ये व्यवसायाचा तपशील, पदनाम, नियुक्तीपत्रे आणि योजनेचे लाभ मंजूर झाल्याच्या वेळेपासूनचे फॉर्म १६ किंवा वेतन स्लिप्स यांचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.