Goa: असंघटीत कामगारांना मोठा दिलासा

गोव्यातील (Goa) 69 विभागातील असंघटीत कामगारांना (workers) एकत्र करुन त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करु.
कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंह
कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंहDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अ.भा. असंघटीत कामगार कॉंग्रेस द्वारे गोव्यातील असंघटीत कामगारांसाठी काम सुरु करण्यात आले असून हे काम पुढे नेण्यासाठी विविध मतदारसंघात गट अध्यक्ष निवडले जात आहेत. गोव्यात पर्यटन उद्योगात काम करणाऱ्या असंघटीत कामगारांना त्यांच्या सेवेचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आपली संघटना काम करणार आहे.

अशी माहिती अखिल भारतीय असंघटीत कामगार कॉंग्रेसचे (Congress)अध्यक्ष अरविंद सिंह (Arvind Singh) यांनी आज दिली. पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. यावेळी असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या गोवा समन्वयक देवसुरभी यदुवंशी , सांत आंद्रे गट अध्यक्ष ज्योयसी डायस व सांताक्रुझ गट अध्यक्ष संजय घाटवळ उपस्थित होते. देशातील असंघटीत कामगारांना संघटीत करुन त्यांच्या न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचे काम आपली संघटना करत असून कामगार कायद्यांची योग्य अंमलबजावणी व्हावी, कामगारांना त्यांचे हक्काचे वेतन मिळावे, त्यांचे शोषण होऊ नये. यासाठी संघटना (Organization) काम करत असल्याचे सिंग यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंह
Goa: कुठ्ठाळीमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते; नागरिकांची गैरसोय

केंद्र सरकारने (Central Government) सुरु केलेल्या श्रम कार्ड योजनेचे स्वागत करुन या योजनेचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना मिळावा यासाठी संघटना प्रयत्न करत असल्याचेही सिंग म्हणाले. गोव्यातील 69 विभागातील असंघटीत कामगारांना एकत्र करुन त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. अशी माहिती यावेळी यदुवंशी यांनी दिली.

या प्रसंगी प्रभव म्हांबरे (पणजी), फ्रान्सिस्को फर्नांडीस (नुवे), अरुण दळवी (कुठ्ठाळी), जोस्ना नुगडे (हळदोणा) व सचिन हलगी (दाबोळी) यांची तेथील गटाअध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहिर करण्यात आली.

कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद सिंह
Goa: राज्यात 710 कोरोना बाधीत तर 3 जणांचा मृत्यू

कॉंग्रेसचे मौनव्रत:

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) झालेल्या किसान मृत्यू प्रकरणाचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने उद्या काही मिनीटे मौन व्रत आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पणजी येथील आझाद मैदानावर उद्या सकाळी 11.30 वाजता होणाऱ्या मौन व्रत आंदोलनात कॉंग्रेसचे गोवा निवडणूक मुख्य निरीक्षक पी चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश राव, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधीपक्षनेते दिगंबर कामत आदी नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com