FDA Goa: अन्न व औषध प्रशासनाची दिवाळीपूर्वी छापेमारी; हजारो किलो खवा, पराठा, फरसाण, मिठाई जप्त

यापूर्वी देखील अन्न व औषध प्रशासनाने 15 ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी छापेमारी केली होती.
FDA Goa
FDA GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीपूर्वी गोव्यातील अन्न व औषध प्रशासन अॅक्शनमोडवर आले असून विविध ठिकाणी तपासणी आणि छापेमारी सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने मंळगवारी म्हापसा, दवर्ली आणि फातोर्डा येथे कारवाई करत हजारो किलो निकृष्ठ दर्जाचे आणि कालबाह्य झालेले (Expire Product) उत्पादन जप्त केले आहे.

FDA Goa
Goa News: गोव्यात पाच वर्षांत 30 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य!

अन्न व औषध प्रशासनाने दिवाळीच्या निमित्ताने विविध ठिकाणी सरप्राईज भेट दिली. प्रशासनाने 34 हजार रूपयांचा पराठा आणि एक लाख 57 हजार रूपयांचा मावा जप्त केला आहे. पराठा परराज्यात तयार केला जात होता आणि अलिशान वाहनांमधून गोव्यात आणाला जात होता. या उत्पादनांवर अन्न सुरक्षा आणि FBO गोवाचे मानके वापरण्यात आली नव्हती. तसेच, विक्रीचे कोणतेही बिल उपलब्ध नसल्याचे अन्न प्रशासनाने म्हटले आहे.

FDA Goa
Goa Government Job : भरती आयोगासाठीच्या कर्मचारी वर्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

म्हापसा येथे जप्त करण्यात आलेला 590 किलो खवा कालबाह्य झालेला होता. तर, दवर्ली येथे जप्त करण्यात आलेला 120 किलो खवा आणि मिठाई तसेच, फातोर्डा येथे जप्त करण्यात आलेला 60 किलो खवा राज्याचे अन्न सुरक्षा मानक पाळण्यात आलेले नाही. अन्न सुरक्षा आणि FBO परवाना नसलेल्यांनी आपले कामकाज थांबवावे अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.

FDA Goa
Goa Agriculture: गोव्यातील झेंडू उत्पादकांना पाऊसाचा फटका!

यापूर्वी देखील अन्न व औषध प्रशासनाने 14 व 15 ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत 65 हजार रूपये किंमतीचे कालबाह्य मिठाई, फरसाण, चिप्स, बेकरी पदार्थ जप्त केले होते. हे सर्व पदार्थांसाठी अन्न आणि औषध परवाना नव्हता तसेच, अस्वच्छ पद्धतीने साठवणूक करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com