Goa Agriculture Export: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गोव्यातून कृषी निर्यात वाढणार; मोपावर लवकरच 'निर्यात पॅक हाऊस'

Goa Organic Export Hub: राज्य सरकारने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १३.५ कोटी रुपयांच्या खर्चाने ''टर्नकी'' तत्त्वावर निर्यात पॅक हाऊस सुविधा संबंधित पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
export pack house at mopa airport for farmers
export pack house at mopa airport for farmersDainiak Goumantak
Published on
Updated on

पणजी: गोवा आणि शेजारील राज्यांमधून होणाऱ्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, राज्य सरकारने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १३.५ कोटी रुपयांच्या खर्चाने ''टर्नकी'' तत्त्वावर निर्यात पॅक हाऊस सुविधा आणि संबंधित पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

फळदेसाई यांच्या मते गोव्याला ‘सेंद्रिय निर्यात केंद्र’'' म्हणून विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. परदेशात वास्तव्यास असलेले गोवेकर आणि स्थानिक उत्पादनांचा वापर करणारे पर्यटक यांच्या उपस्थितीमुळे निर्यातीच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. इतर राज्यातील उत्पादनांच्या तुलनेत गोव्याची उत्पादने अधिक चविष्ट असतात. आमच्या कृषी उत्पादनांसाठी आम्हाला एक चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.

export pack house at mopa airport for farmers
Goa Agriculture: दुर्गंधीयुक्त मळीमुळे मिरची शेती धोक्यात, खालवडे-काणकोण येथे ओहोळाच्या पाण्यासह शेतजमीनही प्रदूषित

उत्पादन निर्यातीसाठी ''कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणा''च्या (एपीईडीए) मानकांशी सुसंगत अशा पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. गोव्याच्या ३०० किलोमीटरच्या परिघामध्ये सध्या अशा प्रकारची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा प्रकारच्या सर्वात जवळच्या सुविधा महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सातारा येथे, तसेच कर्नाटकातील हुबळी आणि धारवाड येथे उपलब्ध आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

१) २०२२ मध्ये अधिसूचित केलेल्या राज्याच्या ''कृषी निर्यात धोरणा''चा मुख्य भर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि राष्ट्रीय कृषी निर्यातीमध्ये गोव्याचा वाटा वाढवण्यावर भर राहिला आहे.

२) गोव्यात पिकवली जाणारी उत्पादने ही नैसर्गिकरित्याच बहुतांशी सेंद्रिय स्वरूपाची असतात; ज्यामुळे प्रस्तावित सुविधेच्या माध्यमातून होणाऱ्या निर्यातीला हातभार लागेल.

३) निर्यात मागणी असलेल्या उत्पादनांमध्ये हिरवी मिरची, काजू, मानकुराद आंबा, मोयरा केळी, आळसांदे आणि कोर्गुट तांदूळ यांचा समावेश आहे.

४) मुरगाव बंदर आणि दाबोळी विमानतळ यांसारख्या सुविधांच्या उपलब्धतेमुळे, हे राज्य एक प्रमुख ''निर्यात केंद्र'' म्हणून विकसित होऊ शकते.

export pack house at mopa airport for farmers
Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

टर्नकी म्हणजे करतात?

टर्नकी प्रकल्प किंवा उपाययोजना म्हणजे: सेवा किंवा सुविधा ज्या कंत्राटदाराद्वारे पूर्णपणे तयार केलेल्या असतात आणि उत्पादन वितरणाबरोबरच खरेदीदारासाठी तात्काळ वापरासाठी तयार असतात. ज्यासाठी पुढील कोणतीही जुळवणी, नूतनीकरण किंवा उभारणीची आवश्यकता नसते. यामध्ये एकाच व्यक्तीवर जबाबदारी सोपवणारा करार अभिप्रेत असतो, ज्यामध्ये डिझाइनपासून ते अंतिम कार्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com