

पणजी: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत असून चार कंपन्यांनी प्रकल्पात रस दाखवला आहे. इच्छुक कंपन्यांच्या मागणीनुसार निविदा सादरीकरणाची मुदत आता ५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२६ तर प्रत्यक्ष निविदा ८ जानेवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार होत्या. कारखान्याच्या पुनर्विकासासाठी सुमारे १३० कोटी रुपयांचा प्रस्ताव मागवण्यात आला असून, हा प्रकल्प सार्वजनिक–खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक चारही कंपन्यांनी गेल्या महिन्यात झालेल्या पूर्व-निविदा बैठकीत सहभाग नोंदवला होता. निविदा तयार करण्यासाठी अधिक वेळाची मागणी केल्याने राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी खासगी सहभागातून कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते.
२०२२ मध्ये दोन निविदादार पात्र ठरले होते, मात्र अटी पूर्ण न झाल्याने ते अपात्र ठरले. २०२४ मध्ये एकही निविदा प्राप्त झाली नव्हती. प्रस्तावानुसार कृषी विभाग दररोज किमान ३,५०० टन ऊस गाळप क्षमता, इथेनॉल प्रकल्प आणि बॉटलिंग युनिट उभारण्याचा मानस ठेवत आहे.
२.४ लाख चौरस मीटर जमीन
कारखान्याकडे २.४ लाख चौरस मीटर जमीन विकासासाठी उपलब्ध
सध्या राज्यात सुमारे ५५० हेक्टरवर ऊस लागवड होत असून त्यातून दरवर्षी सुमारे ६० हजार टन ऊस उत्पादन होते.
२०१९-२० हंगामानंतर कारखाना बंद होण्यापूर्वी शेजारील राज्यांतील भागातूनही ऊस आणला जात होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.