Online Gambling Bust: बाणावलीत ऑनलाईन जुगाराचा पर्दाफाश, कोलवा पोलिसांचा सापळा रचून छापा, 2.60 लाख रुपयांच्या मुद्देमालासह तिघे गजाआड

Benaulim online gambling raid: बाणावली येथील वासवाडो भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराचा कोलवा पोलिसांनी पर्दाफाश केला.
Online Gambling Bust
Online Gambling BustDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: बाणावली येथील वासवाडो भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराचा कोलवा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत तीन जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या ताब्यातील सुमारे २.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई २४ रोजी रात्री साडेदहा ते २५ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. सनी तेलंग (३०, मूळ रा. अहमदाबाद, गुजरात), राहुल पटेल (३३, मूळ रा. अहमदाबाद) आणि तेजसकुमार दबगर (३६, मूळ रा. मेहसाणा, गुजरात) यांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध जुगार प्रतिबंधात्मक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Online Gambling Bust
Goa Weather Update: गोव्यात उन्हाचा 'हिट'मॅन! सलग 3 दिवस पारा 35 अंशांवर, नागरिक उकाड्याने हैराण

दरम्यान, कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत, पोलिस कर्मचारी मंजू वांतामुरी, हवालदार रोहन नाईक आणि पोलिस कॉन्स्टेबल निखिल नाईक यांनी ही कारवाई केली.

Online Gambling Bust
Goa mining: आनंदम, व्यंकटेश्वरना प्रत्येकी दोन खाण पट्टे, चार खाणपट्ट्यांचा लिलाव पूर्ण; दोन पट्ट्यांचा निर्णय सुनावण्‍यांनंतर

सापळा रचून छापा

बाणावलीतील ‘ऐरा सलून अँड स्पा’च्या वरील इमारतीतील फ्लॅट क्रमांक २ मध्ये बेकायदेशीर ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती कोलवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली आणि संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी दोन लॅपटॉप, पाच मोबाईल फोन तसेच ऑनलाईन जुगारासाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com