Goa Government: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदार कामगारांना भरपगारी सुट्टी; गोवा सरकारचा निर्णय

उद्योजकांसह विरोधकांचेही टीकास्त्र, उद्या मतदान प्रक्रिया
Goa Announces Paid Holiday On Karnataka Election Day
Goa Announces Paid Holiday On Karnataka Election DayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Announces Paid Holiday On Karnataka Election Day: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून 10 मे रोजी राज्यातील कर्नाटकमधील मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.

यावर राज्यातील उद्योग जगतासह आम आदमी पक्ष, आरजी या विरोधकांनी जोरदार टीका केली असून अशी सुट्टी जाहीर करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का? असा प्रश्न केला आहे. यावर कायदेशीर मदत मिळते का? यासाठी औद्योगिक संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत.

शेजारील कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. यासाठीच्या जाहीर प्रचाराची आज सांगता झाली. या निवडणुकीच्या प्रचाराकरता राज्यातून विरोधी काँग्रेससह सत्ताधारी भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि नेते कर्नाटकात गेले होते.

Goa Announces Paid Holiday On Karnataka Election Day
Goa Industries: हा मुर्खपणाचा निर्णय! गोवा सरकार पगारी रजा कशी घोषित करू शकते? गोव्यातील उद्योगांचा सवाल

कर्नाटकातील सीमा भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक गोव्यात विविध उद्योगांत काम करतात. कर्नाटकात जास्तीत जास्त मतदान व्हावे हे लक्षात घेऊन राज्य सरकारने कर्नाटकातील मतदारांकरिता 10 मे रोजी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.

यात विविध उद्योगांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, रोजंदारीवरील कामगार, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेले कर्मचारी यांचा समावेश आहे.

यावर गोवा औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी जोरदार आक्षेप नोंदवला असून गोवा सरकार कर्नाटकच्या निवडणुकीसाठी भरपगारी सुट्टी कसे घोषित करू शकते असे म्हणत हा पूर्णपणे मूर्खपणाचा निर्णय आहे असे म्हटले आहे.

इतर राज्यातील निवडणुकांसाठी असेच सुरू राहिल्यास गोव्यात व्यवसाय करणे कठीण होईल. आम्ही सरकारच्या या प्रकारच्या एकतर्फी निर्णयावर कायदेशीर उपाय शोधत आहोत, असेही ते म्हणाले.

यावर आरजी पक्षाने जोरदार हल्ला चढवत राज्य सरकार बाहेरील राज्यांमध्ये निवडणुकीसाठी अशी सुट्टी जाहीर करत असेल, तर तो चुकीचा पायंडा असेल, असे म्हटले आहे. आम आदमी पक्षानेही सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेतला आहे.

Goa Announces Paid Holiday On Karnataka Election Day
Bhopal-Goa Flight: भोपाळ-गोवा विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू होणार; जाणून घ्या वेळापत्रक, तिकीटाचे दर...

आश्‍‍चर्यकारक निर्णय : पालेकर

"सरकारने घेतलेला निर्णय अयोग्‍य आहे. कर्नाटक निवडणुकीची गोवा सरकारला इतकी काळजी का? मतदानासाठी सरसकट भरपगारी सुट्टी देणे आश्‍‍चर्यकारक आहे," अशी प्रतिक्रिया आपचे गोवा अध्‍यक्ष अमित पालेकर यांनी दिली.

‘प्रमोद सावंत गोव्याचेच मुख्यमंत्री की कर्नाटकचे?’

प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री की कर्नाटकचे? असा सवाल आपचे युवा उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी केला आहे. गोवा सरकारने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भरपगारी सुट्टी देण्याचा निर्णय अयोग्‍य आहे.

उद्योजक संघटनाही नाराज

कर्नाटक राज्यातील निवडणुकीसाठी गोवा सरकारने कन्‍नडिंग मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. त्या निर्णयावर अखिल गोवा उद्योजक संघटनेनेही नाराजी व्यक्त केली आहे. गोवा सरकार कर्नाटकच्या निवडणुकीसाठी १० मे रोजी भरपगारी सुट्टी कसे घोषित करू शकते, असा सवाल उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांना केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com