Bhopal-Goa Flight: भोपाळ-गोवा विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू होणार; जाणून घ्या वेळापत्रक, तिकीटाचे दर...

केवळ दोन तासांचा प्रवास; गेल्या 12 वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य
Bhopal-Goa Flight Details
Bhopal-Goa Flight Details Dainik Gomantak

Bhopal-Goa Flight Timetable and Fare: आता मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ ते गोव्यासाठी थेट विमानसेवा या महिन्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे थेट मध्य भारतातून अवघ्या दोन तासांमध्ये गोव्यात पोहचता येणार आहे. यापुर्वी भोपाळमधील रहिवाशांना विमान प्रवासात मुंबई किंवा बंगळुरूमार्गे गोव्याला जावे लागायचे.

Bhopal-Goa Flight Details
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गामुळे 'हे' गाव ठरले कमनशिबी; उत्पन्नात झाली मोठी घट

आता मात्र 23 मे पासून भोपाळ-गोवा थेट विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो एअरलाईन्सने ही फ्लाईट त्यांच्या उन्हाळी वेळापत्रकात समाविष्ट केली आहे. आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही सेवा असेल.

भोपाळ ते उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी ही फ्लाईट असेल. या फ्लाईटच्या तिकिटाचे दर 4,000 रुपये इतका आहे.

फ्लाइट शेड्यूल
गोव्याहून प्रस्थान- सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी
भोपाळमध्ये आगमन सकाळी 11 वाजून 40 मिनट

भोपाळहून प्रस्थान दुपारी 12 वाजून 10 मिनटांनी
गोव्यात आगमन दुपारी 02 वाजून 05 मिनिटांनी

Bhopal-Goa Flight Details
Goa Land Grab Case: जमीन हडप घोटाळ्यात आणखी एकास अटक; 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

गेल्या 12 वर्षांपासून भोपाळ-गोवा या विमानसेवेची मागणी होत होती, ती आता पुर्णत्वास गेली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याची दखल घेत ही मागणी पूर्ण केल्याचे बोलले जात आहे. शिंदे हे मध्य प्रदेशचे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com