Goa Casino Raid: क्रूझ कॅसिनो प्राईडचे संचालक वाडियांना समन्स; छापेमारीच्या कारवाईत अडथळा आणणं पडलं महागात!

Casino Pride Director Ashok Wadia Summons: अशोक वाडिया तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सक्तवसुली संचालनालय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला तसेच बंदिस्त करून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Goa Casino Raid: क्रूझ कॅसिनो प्राईडचे संचालक वाडियांना पोलिसांचं समन्स; छापेमारीच्या कारवाईत अडथळा आणणं पडलं महागात!
Goa Casino RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मांडवी नदीतील क्रूझ ‘कॅसिनो प्राईड’वरील छाप्याच्या कारवाईवेळी क्रूझचे संचालक अशोक वाडिया तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सक्तवसुली संचालनालय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला तसेच बंदिस्त करून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चौकशीसाठी पोलिसांनी संचालक वाडिया याला समन्स बजावून चौकशीसाठी २० रोजी पोलिस स्थानकात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

गेल्या ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा घातलेल्या छाप्यावेळी ‘ईडी’च्या (ED) कामात व्यत्यय आणल्याने तसेच त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी पणजी पोलिसांत कॅसिनो संचालकांसह तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध साहाय्यक सक्तवसुली अधिकारी महेश कुमार चौधरी यांनी तक्रार दाखल केली आहे. मनी लाँडरिंग कायद्याखाली ‘इडी’च्या अधिकाऱ्यांनी एका प्रकरणाच्या चौकशीप्रकरणी कॅसिनो प्राईडवर छापा टाकला.

त्यावेळी क्रूझचे संचालक अशोक वाडिया, गोपाळ रामनाथ नाईक आणि आरती राजा तसेच इतर कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून बाचाबाची केली. दस्तावेज न देण्याची धमकी दिली. या अधिकाऱ्यांना संशयितांनी आवश्‍यक असलेले दस्तावेज चौकशीसाठी दिले नाहीत. उलट त्यांना धमकावून एका खोलीत बंदिस्त करून ठेवले. अधिकाऱ्यांनी जमा केलेले काही महत्त्वाचे दस्तावेजही कॅसिनो अधिकाऱ्यांनी नष्ट केले, असे तक्रारीत नमूद केले होते.

Goa Casino Raid: क्रूझ कॅसिनो प्राईडचे संचालक वाडियांना पोलिसांचं समन्स; छापेमारीच्या कारवाईत अडथळा आणणं पडलं महागात!
ED Raids Goa Casinos: कर चुकवेगिरी, फ्रॉड व्यवहारांची चौकशी; ईडीची उशीरा रात्री कॅसिनोत झाडाझडती

कॅसिनोवर पोलिस तैनात

सक्तवसुली संचालनालयाचे संयुक्त संचालक पीयूषकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला होता. छाप्यावेळी कॅसिनोच्या दस्तावेज चौकशीला विरोध होत असल्याने तसेच दस्तावेज देण्यास विरोध होत असल्याने सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पणजी पोलिसांना बोटीवर बोलावून घेतले होते. त्यावेळी बंदिस्त केलेल्या अधिकाऱ्यांची पोलिसांनी सुटका केली होती व पुढील चौकशीचा मार्ग मोकळा झाला. त्या ठिकाणी पुन्हा कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांकडून (Employees) विरोध होऊ नये म्हणून पोलिसही तैनात केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa Bench Casino Order
Goa Mandovi River Casino Dispute
New Casino Vessel Permission
Mandovi River Casino PIL
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com