Goa Temple Tourism: रुद्रेश्वर तीर्थक्षेत्राला नवसंजीवनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत,19 कोटींचा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होणार

Rudreshwar Temple Harvalem: मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हरवळे-साखळी येथील श्री रुद्रेश्वर मंदिर परिसरात पर्यटन खात्यातर्फे सुरू असलेल्या विकासकामांची विविध अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
Goa Temple Tourism
Rudreshwar Temple HarvalemDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसराच्या सुशोभीकरणासाठी सरकारकडून राबविण्यात येत असलेला १९ कोटी रुपयांचा प्रकल्प हा गोव्यातील ‘स्टेट ऑफ आर्ट’ स्वरूपाचा प्रकल्प असून त्यात परिसराचे दैवी आणि नैसर्गिक महत्त्व अबाधित ठेवले जाणार आहे.

एकही झाड न तोडता नव्याने फुलझाडे, औषधी वनस्पती आणि फळझाडांची लागवड केली जाणार असून प्रकल्पाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हरवळे-साखळी येथील श्री रुद्रेश्वर मंदिर परिसरात पर्यटन खात्यातर्फे सुरू असलेल्या विकासकामांची विविध अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

Goa Temple Tourism
Goa CM Pramod Sawant: सोने खरेदीवर संयम ठेवा! लोकांनी पंतप्रधान मोदींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

यावेळी अभियंता प्रमोद बदामी, देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, हरवळे येथील रुद्रेश्वर मंदिर आणि धबधबा हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. धबधबा पाहण्यासाठी तसेच विविध धार्मिक विधी, अस्थी विसर्जन आणि तीर्थदर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येथे येत असतात.

नदीपलीकडे असलेल्या प्रभू पादुकांच्या दर्शनासाठीही गोमंतकीयांसह जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Goa Temple Tourism
CM Pramod Sawant: "गोवा परप्रांतीयांची 'दुबई' होऊ देऊ नका!" मुख्यमंत्री सावंतांचे युवकांना आवाहन; राज्य-केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचा हात

सुशोभीकरणाचे काम नियोजनबद्ध आणि समाधानकारक पद्धतीने सुरू असल्याचे सांगून देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर यांनी मुख्यमंत्री यांनी सुचविलेल्या विविध मुद्द्यांवर समितीच्या बैठकीत चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले.

करमळे-कुडणेसाठी पूल!

प्रकल्पांतर्गत मंदिर परिसरात सुमारे एक हजार पायऱ्यांची उभारणी करून परिक्रमेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच हरवळेच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या करमळे-कुडणे गावांतील नागरिकांसाठी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या पुलाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याशिवाय प्रभू पादुका मंदिराकडे जाणारा विद्यमान लोखंडी पूलही अधिक मजबूत आणि कायमस्वरूपी स्वरूपात विकसित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com