Goa Government: म्हापशातील स्थानबद्धता केंद्राकडे सरकारचे 'दुर्लक्ष'

Goa: समाजकल्याण खात्याचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak

Mapusa: राज्यातील बांगलादेशींविरुद्ध एटीएस व स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. पण म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्राची अवस्था साधनसुविधांअभावी बिकट झाली आहे. बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींना या केंद्रामध्ये ठेवण्यासाठी सोय नसल्याने नामुष्की ओढवली आहे. समाजकल्याण खात्याचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

म्हापशातील स्थानबद्धता केंद्रात सध्या 9 विदेशी नागरिक आहेत. मात्र, तेथे मूलभूत साधनसुविधा नसल्याच्या तक्रारी त्यांच्याकडूनकडून होत आहेत. हे केंद्र सुरक्षिततेसाठी विदेशगमन प्रादेशिक क्षेत्र कार्यालयाच्या (Foreigners Registration Office) अखत्यातिरत येत असले तरी त्यामध्ये साधनसुविधा व इतर सोयी पुरवण्याचे काम समजाकल्याण खात्याचे आहे.

Goa Government
Goa Government: अनधिकृत चिरेखाणीप्रकरणी खंडपीठाकडून चांगलीच खरडपट्टी!

दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी या खात्याला वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या केंद्रासाठी समाजकल्याण खात्याचा अधीक्षकपदाचा अधिकारी असणे सक्तीचे आहे. मात्र, 2020 पासून येथे कोणीही अधिकारी नाही. ज्या दोन कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नेमण्यात आले आहे ते ड्युटीवर येत नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्रात बंदिस्त ठेवण्यात आलेल्या विदेशी नागरिकांसाठी आवश्‍यक प्रमाणात खाटा व बिछानेही नाहीत. त्यामुळे तेथे राहण्याची मोठी समस्या आहे. या अपुऱ्या साधनसुविधेसंदर्भात पोलिसांनी समाजकल्याण खात्याला माहिती देऊनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे.

Goa Government
Land Grabbing Case : जमीन हडपप्रकरणात जीत आरोलकरांचं नाव; कारवाई नाहीच

दरम्यान, हे केंद्र स्थापन सुरू झाले तेव्हा सुरवातीला एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. परंतू या केंद्रासाठी आवश्‍यक असलेल्या साधनसुविधांची सोय केली जात नसल्याने त्यांनीही अधीक्षकपदाला रामराम केला. पोलिसांनी माणुसकीच्या दृष्टीने काही काळ अन्नपुरवठा केला. नंतर समाजकल्याण खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले.

विदेशगमन प्रादेशिक नोंदणी कार्यालयात 2019 पासून आतापर्यंत 106 विदेशी नागरिकांना भारतातील बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील सध्या 9 जण म्हापशातील स्थानबद्धता केंद्रात आहेत. सरकारच्या माहितीनुसार 2020 पासून आता 2022 पर्यंत 50 विदेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आफ्रिकेचे अधिक आहेत. युगांडाच्या 36 जणांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये तांझानिया, नायजेरियन्स व रशियन्स यांचा समावेश आहे.

Goa Government
Goa Crime: फोंड्यात सोनसाखळी हिसकावण्‍याचे प्रकार वाढले, महिलांमध्‍ये घबराटीचे वातावरण

पडताळणी सुरु

3 वर्षांत एफआरआरओने 18 मुलांसह 56 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. त्यातील 6 जणांची पाठवणी करण्यात आली आहे. दोघेजण फरार आहेत. इतरांच्या हालचालींवर निर्बंध घालून नजरकैदेत आहेत. हल्ली ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची पडताळणी एफआरआरओमार्फत करण्यात येत असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

बॉस्को जॉर्ज, अधीक्षक, एफआरआरओ-

अवैध वास्तव्यप्रकरणी विदेशी नागरिकांना बंदिस्त ठेवण्यासाठी म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्राचा काहीही संबंध नाही. हे केंद्र समाजकल्याण खात्याच्या अखत्यारित येते. केंद्रातील अपुऱ्या साधनसुविधेसंदर्भात प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com