Goa Crime: फोंड्यात सोनसाखळी हिसकावण्‍याचे प्रकार वाढले, महिलांमध्‍ये घबराटीचे वातावरण

Ponda: दुचाकीवर पाठीमागून येऊन चोरटे गळ्‍यातील दागिने हिसकावून नेतात.
Chain Theft
Chain TheftDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda: गळ्‍यातील सोनसाखळी, मंगळसूत्र हिसकावण्‍याचे प्रकार फोंडा तालुक्यात अलीकडे वाढले आहेत. दुचाकीवरून पाठीमागून येऊन चोरटे गळ्‍यातील दागिने हिसकावून नेतात. त्‍यामुळे लोकांमध्‍ये विशेषत: महिलांमध्‍ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फोंडा तालुक्‍यातील सावईवेरे, केरी, बेतोडा, बांदोडा, बोरी आदी गावांतील रस्त्यावंर चोरटे दुचाकीने फिरतात. त्‍यांच्‍या डोक्‍यावर हेल्‍मेट असते. रस्त्यावर कोणी एकटी महिला चालताना दिसली तर पत्ता विचारण्याच्या बहाणाने तिच्‍या गळ्यातील दागिने हिसकावून ते पळ काढतात. असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्‍यामुळे पोलिसांनी दिवसरात्र नाक्यानाक्यावर नाकाबंदी करावी, जेणेकरुन चोरटे सापडतील, असे मत नागरिकांनी व्‍यक्त केले आहे.

Chain Theft
Goa IIT: ग्रामस्थांचा पंचायत मंडळावर प्रश्नांचा भडिमार; ग्रामसभेमध्ये वातावरण तापले!

गेल्या आठवड्यात पाणीवाडा-बोरी व मोटया येथे गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या. चोरट्यांकडून जे सोनार कमी किमतीत सोने खरेदी करतात, त्‍यांच्‍यावरही पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. फोंडा भागातील ग्रामीण भागात चोरट्यांचा जास्त सुळसुळाट झाला असल्‍याचे आतापर्यंत घडलेल्या घटनांवरुन दिसून येते. येथील लोक आता सावध झाल्याने चोरटे आपला मोर्चा अन्य तालुक्यांकडे वळविण्‍याची शक्‍यता आहे.

अन्‌ चोरटेही फसले

पाणीवाडा-बोरी येथील एक वयस्कर महिला रस्त्यावरुन जात असता मोटरसायकलवरून आलेल्‍या चोरट्यांनी तिच्‍या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली ते पळून गेले. काही अंतर गेल्‍यावर ती सोनसाखळी सोन्याची नसल्याचे चोरट्यांच्‍या लक्षात आले. त्‍यांनी पुन्‍हा ती आणून टाकली व पळ काढला.

Chain Theft
Miramar Theft: गोव्यासह चार राज्यात चोऱ्या करणाऱ्याच्या मुसक्या गोवा पोलिसांनी आवळल्या

थरारक अनुभव

मोटया येथे गेल्‍या सोमवारी मी आपल्या दुकानावर बसली होती. तेव्हा दुचाकी घेऊन दोघेजण आले. एकाने हेल्मेट घातले होते. पाठीमागे बसलेला युवक दुकानावर आला आणि सिगारेट आहे काय म्हणून विचारले. तसेच पत्ताही विचारू लागला. मी पत्ता पाहत असल्‍याची संधी साधून त्‍याने माझे मंगळसूत्र हिसकावण्‍याचा प्रयत्‍न केला.

मीसुद्धा प्रतिकार करताना मंगळसूत्र एका हाताने घट्ट पकडून ठेवले. त्‍यामुळे मंगळसूत्राचा अर्धा भाग माझ्या हातात राहिला. त्याच्या कॉलरला मी घट्ट पकडले व ओरडायला सुरूवात केली. तेव्हा त्याने मला ढकलून दिले व दुचाकीच्या मागे बसून पळ काढला, असे शोभन नाईक या महिलेने सांगितले.

Chain Theft
Goa Crime News: गोवा पोलिस 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; हणजूणेतील बागा पबवर धडक कारवाई

प्रशिला नाईक, बेतोडा-

मी सायंकाळी कामावरुन घरी जात असताना पाठीमागून दोघेजण दुचाकीवरून आले. दुचाकी चालवित होता, त्‍याने हेल्मेट घातले नव्हते. पण पाठीमागे बसलेल्या चोरट्याने हेल्मेट घातले होते. त्यानेच माझ्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. मी ओरडायला लागले, तेव्हा माझ्या अंगावर त्‍यांनी गाडी घालण्‍याचाही प्रयत्‍न केला. त्‍यानंतर ते पळून गेले. दोघेही शरीराने लठ्ठ होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com