Land Grabbing Case : जमीन हडपप्रकरणात जीत आरोलकरांचं नाव; कारवाई नाहीच

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आज पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची भेट घेऊन त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
MLA Jit Arolkar
MLA Jit Arolkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Land Grabbing Case : राज्यातील जमीन हडपप्रकरणी पोलिस खात्याच्या एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. पेडणे तालुक्यातील धारगळ येथील सुमारे 1.48 लाख चौ. मी. क्षेत्रफळ जमीन हडपप्रकरणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि इतरांविरुद्ध अमेरिकेत स्थायिक असलेल्या 76 वर्षीय वृद्ध रवळू खलप यांच्यावतीने तक्रार दाखल करूनही कोणतीच कारवाई एसआयटीमार्फत झालेली नाही. त्यामुळे ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आज सोमवारी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची भेट घेऊन त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी एसआयटी पोलिस अधीक्षकांकडे 4 जुलैला तक्रार दिली होती. मात्र आजपर्यंत तक्रारीसंदर्भात संबंधितांविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी महासंचालक सिंग यांना भेटून निदर्शनास आणून दिले. प्रादेशिक विकास आराखड्यात ही मालमत्ता बागायतची जमीन म्हणून दाखवण्यात आले आहे आणि आजपर्यंत त्याचे कोणत्याच प्रकारे जमीन सनदाचे रुपांतरण झालेले नाही किंवा पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यासंदर्भात सुनावणी झालेली नाही.

या प्रकरणातील आमदार जीत आरोलकर या बेकायदेशीर जमीन घोटाळा प्रकरणामधून मिळालेल्या निधीचा वापर कोणतीही परवानगी न घेता रस्ते तसे विजेचे खांब उभारण्यासाठी केला आहे. संबंधित खात्याने कोणतीची कारवाई केलेली नाही. पोलिस कॉन्स्टेबल पद सोडून राजकारणात आलेल्या आरोलकर यांची मागील निवडणुकीत मालमत्तेसंदर्भात सादर केलेल्या माहितीनुसार चौकशी करण्याची मागणी रवळू खलप यांच्यावतीने ॲड. रॉड्रिग्ज यांनी केली आहे.

MLA Jit Arolkar
CM Pramod Sawant : संघटनेला विश्‍वासात घेऊनच कामचुकार कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई

दरम्यान धारगळ येथील जमीन दहा वर्षापूर्वी विकसित करण्यात आली आहे. या जमिनीवर दावा करणारे रवळू खलप हे सहमालक असल्याचे आजपर्यंत जमिनीचे दस्तावेज पुरावेदाखल सादर करू शकलेले नाही. ही जमीन सर्व प्रक्रिया कायदेशीपरणे त्याचे सोपस्कार करूनच करण्यात आली आहे. खलप यांना या जमिनीत कोणतेच अधिकार नाहीत आणि त्यांचे नाव त्यामध्ये चुकीने लागले गेले आहे. त्यांनी आजपर्यंत स्वतः माझ्याकडे या जमिनीसंदर्भात चर्चा केलेली नाही. हा एकूण राजकीय स्टंट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कायद्यानुसार तक्रार दाखल करता येत नाही असा दावा मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com