Goa University: पणजी, पर्वरीतील 6 महाविद्यालये जाणार शहराबाहेर! सरकारला हवी विद्यापीठाची 2 लाख चौ.मी. जमीन

Goa University College Relocation: या बैठकीत महाविद्यालयांसाठी आकाराला आणण्यात येणाऱ्या नव्या उच्च शिक्षण संकुलाची माहिती राज्यपालांसमोर सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Goa University
Goa University NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजीतील पाच आणि पर्वरीतील एक मिळून सहा महाविद्यालये शहराबाहेर हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी गोवा विद्यापीठाची २ लाख चौरस मीटर जमीन सरकारला हवी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

या मागणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर आदी होते. उच्च शिक्षण संचालकांनी काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात स्मरणपत्रही

पाठवले होते. त्यावर विद्यापीठाकडून काहीच प्रतिक्रिया न आल्याने मुख्यमंत्र्यांनी कुलपती या नात्याने राज्यपालांची भेट घेण्याचे ठरवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की अर्धा तास चाललेल्या या बैठकीत गोवा संगीत महाविद्यालय, गोवा वास्तुकला महाविद्यालय, गोवा गृहविज्ञान महाविद्यालय, गोवा औषध निर्मितीशास्त्र महाविद्यालय आणि गोवा दृश्यकला महाविद्यालये आणि पर्वरीतील सध्याच्या डीएड आणि प्रस्तावित बीएड महाविद्यालयासाठी विद्यापीठाने २ लाख चौरस मीटर जमीन उपलब्ध करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. कुलपती या नात्याने राज्यपालांना ही संकल्पना पसंत पडली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांना याबाबत माहिती देतो, असे त्यांनी सांगितले आहे.

विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत या विषयावर चर्चा करण्याआधी विद्यापीठाचे अधिकारी आणि राज्‍य सरकारचे अधिकारी यांची जागा निवडीसाठी संयुक्त बैठक २/३ आठवड्यांत आयोजित करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. पावणेबारा ते सव्वाबारा अशी अर्धा तास ही बैठक चालली. या बैठकीत महाविद्यालयांसाठी आकाराला आणण्यात येणाऱ्या नव्या उच्च शिक्षण संकुलाची माहिती राज्यपालांसमोर सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Goa University
Goa University: स्थानिकांच्या आक्षेपानंतर गोवा विद्यापीठाची माघार! बाहेरील विद्यार्थ्यांचे आरक्षण जुन्या नियमानुसार

आश्‍वासन पूर्ततेच्या दिशेने पाऊल

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात पणजीतील सरकारी महाविद्यालयांसाठी शहरालगत मोठे शैक्षणिक संकुल उभारले जाईल, असे नमूद केले होते. त्याची पूर्तता करण्याचे पाऊल टाकण्यासाठी आजची राजभवनातील बैठक होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Goa University
Goa Cabinet: कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या मंत्र्यांचा शपथविधी? CM सावंतांनी तातडीने घेतली राज्यपालांची भेट

मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा नाहीच

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की मंत्रिमंडळ फेरबदल कधी होणार, याविषयी सर्वांना उत्सुकता असली तरी राज्यपालांशी त्या विषयावर चर्चा झालेली नाही. ज्यावेळी तो निर्णय होईल, तेव्हा सर्वांना समजेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही लगेच मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता फेटाळली. ते म्हणाले, ‘तसा निर्णय झाला की त्याची माहिती जाहीरपणे देऊ. तूर्त त्यावर चर्चा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com