Goa Cabinet: कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या मंत्र्यांचा शपथविधी? CM सावंतांनी तातडीने घेतली राज्यपालांची भेट

Goa Cabinet Reshuffle: भाजप सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.
Goa Cabinet Reshuffle
Goa CM Pramod Sawant And Governor P. S. Shreedharan pillaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी (०३ एप्रिल) सकाळी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेने त्यामुळे उसळी घेतली आहे. ही भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात विशेष महत्त्वाची मानली जात आहे; कारण सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र, या भेटीमुळे राजकीय हालचालींना अधिकच उधाण आले आहे. भाजप सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. काही मंत्र्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही तर्क-वितर्क लावले जात आहेत पक्षातील काही नेत्यांनी फेरबदलाची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील या भेटीकडे राजकीय निरीक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.

Goa Cabinet Reshuffle
Pune Sindhudurg Flight: पुण्यातून दीड तासांत सिंधुदुर्गला जाता येणार; गोव्याच्या कंपनीकडून आठवड्याचे 5 दिवस विमानसेवा सुरु

यापूर्वीही अशा प्रकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चामध्ये राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या भेटी झाल्या आहेत. मात्र, यावेळी फेरबदल निश्चित असल्याचे काही राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. राज्यातील विकासकामे अधिक प्रभावी करण्यासाठी हा फेरबदल केला जाणार असल्याची शक्यता आहे.

Goa Cabinet Reshuffle
Mhadei Water Dispute: कळसा - भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकच्या हालचालींना वेग; खानापूरात करणार भूसंपादन

वरिष्ठ नेते नाराज

सरकारमधील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे नव्या मंत्र्यांना संधी देऊन सरकार मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची भेट नवी राजकीय समीकरणे तयार करू शकते. आता फेरबदल कधी होतो आणि कोणते चेहरे मंत्रिमंडळात समाविष्ट होतात, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com