Goa Traffic: वाहनधारकांनो लक्ष द्या! हेड कॉन्स्टेबल नव्हे तर केवळ 'हे' अधिकारीच जारी करू शकतात चलन...

राज्य सरकारचे स्पष्टीकरण; वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 200 वरून 65 वर
Goa Traffic Cell
Goa Traffic CellDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government on Traffic Challan: राज्य पोलिस दलात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चलन देण्यासाठी हेड कॉन्स्टेबलना परवानगी द्यावी, ही गोवा गोवा पोलिसांच्या ट्रॅफिक सेलने केलेली विनंती राज्य सरकारने फेटाळून लावली आहे.

केंद्रीय कायद्यानुसार केवळ अधिकारीच चलन जारी करू शकतात. सध्या केवळ सहाय्यक उपनिरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, निरीक्षक आणि उप पोलिस अधीक्षकांनाच चलन देण्याचा अधिकार आहे.

Goa Traffic Cell
CM Pramod Sawant: गोव्यातील 90 टक्के गुन्हे बिहार, युपीतील कामगारांमुळे; मुख्यमंत्र्यांचा परप्रांतीयांवर निशाणा

वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. सातार्डेकर यांनी म्हटले आहे की, आम्ही हा प्रस्ताव कायदा विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवला होता. पण, त्यांचेही मत हेच आहे की केवळ एक अधिकारीच चलन जारी करू शकतो.

वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातांमुळे सार्वजनिक असंतोष वाढत आहे. याबाबत अधिक तक्रारी येत आहेत. गोवा पोलिसांतील वाहतूक सेलच्या कर्मचारी संख्या गेल्या वर्षीच्या 200 वरून आता केवळ 65 वर आली आहे. ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

सहाय्यक उपनिरीक्षकांना PSI म्हणून बढती दिल्याने सेलची ताकद आणखी कमी होईल आणि लवकरच ते प्रशिक्षणासाठी जातील. सध्या फक्त सहाय्यक उपनिरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, निरीक्षक आणि उप पोलिस अधीक्षकांनाच चलन देण्याचे अधिकार आहेत.

Goa Traffic Cell
Zero Shadow Day in Goa: गोव्यात उद्या तुमची सावली होणार गायब; जाणून घ्या वेळ...

केंद्र सरकारने 2016 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती की हेड कॉन्स्टेबलना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चालना देण्याचा अधिकार आहे. ही अधिसूचना अद्याप लागू आहे का, याबाबत कक्षाने परिवहन विभागाकडून स्पष्टीकरण मागवले होते.

जुलै 2022 मध्ये, वाहतूक पोलिसांकडून होणार्‍या अवाजवी छळाच्या आरोपांदरम्यान, गोवा पोलिसांनी एक आदेश जारी करून उपविभागीय पोलिस कार्यालये (SDPOs), डेप्युटी एसपी, ट्रॅफिक सेलचे प्रभारी आणि पोलिस ठाण्यांना उद्देशून म्हटले आहे की, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची घठना असल्यास वाहने थांबवली पाहिजेत.

उल्लंघन करणार्‍यांना केवळ डेप्युटी एसपी, एसडीपीओ किंवा निरीक्षकांनीच चलन जारी करू शकतात. या आदेशात नंतर ASI आणि PSI यांना चलन जारी करण्याचे अधिकार देण्यासाठी अंशतः सुधारणा करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com