सहकार क्षेत्रात अहंकाराचा लवलेशही असू नये: सभापती पाटणेकर

सहकार क्षेत्रात विश्वासहार्ता आणि पारदर्शकता महत्वाची आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अहंकार न बाळगता प्रामाणिकपणे कार्यरत राहिल्यास प्रगतीचे शिखर निश्चित गाठता येते.
Rajesh Patnekar
Rajesh PatnekarDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सहकार क्षेत्रात विश्वासहार्ता आणि पारदर्शकता महत्वाची आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अहंकार न बाळगता प्रामाणिकपणे कार्यरत राहिल्यास प्रगतीचे शिखर निश्चित गाठता येते. असे प्रतिपादन डिचोलीचे (Bicholim) आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांनी डिचोली येथे बोलताना केले. आजचे युग हे डिजिटल युग असून सहकारी बँका ग्राहकांना जवळच्या वाटतात. त्यांना सर्व ते सहकार्य करा. असे आवाहनही त्यांनी केले.

ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या (टीजेएसबी) डिचोली येथील ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर सभापती पाटणेकर प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, टीजेएसबी बँकेचे शरद गांगल, व्यावसायिक प्रतिनिधी वैकुंठ (वल्लभ) कापडी, गोवा विभागीय अधिकारी अरुण भट, पंकज रायकर, सौमिल नाडकर्णी आदींची उपस्थिती होती. कुंदन फळारी यांनी मनोगत व्यक्त करून ग्राहक सेवा केंद्राला शुभेच्छा दिल्या.

Rajesh Patnekar
तृणमूल गोव्यात काँग्रेसला कमकुवत करतेय

अरुण भट यांनी या प्रसंगी ग्राहक सेवा केंद्रात उपलब्ध असणाऱ्या सेवा विषयी सविस्तर माहिती दिली. शरद गांगल या वेळी बोलताना म्हणाले की ठाणे जिल्हा सहकारी बँक ही आपुलकी आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालत सहकार तत्वावर कार्यरत आहे. यापुढे कोर बँकिंग सुविधा ग्राहकांना देण्याचा बँकेचा मानस आहे.ग्राहकांचा विश्वास या मुळेच बँक उत्तमोत्तम सेवा देत आहे. गांगल यांनी बँकेचा चढता आलेख सादर केला व सविस्तर आढावा घेतला. किरण नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी श्री. कापडी यांनी सर्वांचे आभार मानले.

ग्राहक सेवा केंद्रातील सुविधा

सुंदरपेठ-येथे सुरु करण्यात आलेल्या केंद्रातून ग्राहकांना पाण्याची बिले, विजेची बिले भरण्याची तसेच बचत, करंट खात्यांशी व्यवहार हाताळता येणार आहेत. खात्यातून 25 हजारपर्यंत पैसे काढण्याच्या सुविधेबरोबरच विविध प्रकारच्या डिजिटल सेवाही उपलब्ध असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com