Margao: मडगावात वीज बिले जाळली! दरवाढीविरोधात गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; सरकारला दिला इशारा

Goa Forward: मडगाव नगरपालिका इमारतीसमोर गोवा फॉरवर्ड तर्फे निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज बिले जाळत आक्रमक आंदोलन केले.
Goa Forward protest
Goa Forward protestDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सरकार एकीकडे जीएसटी कमी झाल्याचा उत्सव साजरा करते, तर दुसरीकडे गोमंतकीयांच्या माथ्यावर वीज दरवाढीचे ओझे लादते. गरीबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या या सरकारने तात्काळ ४ टक्के वीज दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा भाजपला २०२७ मध्ये जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.

मडगाव नगरपालिका इमारतीसमोर गोवा फॉरवर्ड तर्फे निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज बिले जाळत आक्रमक आंदोलन केले. अशाच प्रकारचे आंदोलन राज्यभर सर्व मतदारसंघांत उभारण्यात येईल, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

राज्यात वीज खात्याचा तब्बल ३५० कोटी रुपयांचा महसूल बाकी आहे, त्यातील १४५ कोटी रुपये सरकारी खात्याकडूनच थकलेले आहेत. “प्रथम ती वसुली करा, नंतर जनतेवर ओझे टाका,” अशी सरदेसाईंची सरकारला टोला देणारी मागणी होती.

Goa Forward protest
Electricity Bill: सणासुदीत विजेचा शॉक, दरवाढ लागू; प्रत्येकाचे बिल सरासरी 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार

गोव्यातून मोठ्या प्रमाणावर कोळसा वाहतूक व वापर होत असून त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा फायदा गोमंतकीयांना मिळायलाच हवा. सरकारने दरवाढीऐवजी स्थानिकांना सवलत द्यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

Goa Forward protest
Electricity Bill Scam: ग्राहकांकडून घेतले वीज-बिलाचे पैसे, बँकेत भरलेच नाहीत; 8 लाखांचा घोटाळा, 2 कर्मचारी निलंबित

सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत असल्याने सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सरदेसाई म्हणाले. तथापि, प्रत्येक पक्ष सर्व मतदारसंघांत उमेदवार देण्याच्या गोंधळामुळे जनता संभ्रमित होत असल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी आम आदमी पक्षावर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com