Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Goa Forward Party Youth Vice President Attack: हल्ला केलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
Goa News | Shiroda Crime
Ruonal Kerkar attacked Dainik Gomantak
Published on
Updated on

शिरोडा: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्ष रुनाल केरकर यांच्यावर जीवघेणी हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरोडा येथील कामाक्षी मंदिराजवळ शनिवारी (०६ सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुनाल केरकर चोडणचे रहिवासी असून, गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षापदी कार्यरत आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास कामाक्षी मंदिराजवळ त्यांच्यावर चारजणांनी जीवघेणा हल्ला केल, यात रुनाल गंभीर जखमी झाले आहे संशयितांनी रुनाल यांच्या कारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

Goa News | Shiroda Crime
BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे. हल्ला केलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्यासाठी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. केरकर यांच्यावरील हल्ल्याचा गोवा फॉरवर्डकडून निषेध करण्यात आला आहे.

Goa News | Shiroda Crime
Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

गोवा फॉरवर्ड पर्यावरण विभागाचे संयोजक विकास भगत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे मत व्यक्त केले. "रुनाल यांच्यावर जीवघेणा हल्ल करण्यात आला आहे.

आम्ही या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. अशा घटना सिद्ध करतात की गोवा सरकार गाढ झोपेत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था कोलमडली असताना मुख्यमंत्री राजकीय अजेंडा राबविण्यात व्यस्त आहेत," अशी प्रतिक्रिया भगत यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com