Goa Government Job: पर्यटन खात्‍यात 17 जागासाठी कंत्राटी भरती, 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

goa tourism department recruitment: तालुका पातळीवर पुरुष पर्यवेक्षकांच्‍या दोन आणि पर्यटक वॉर्डन म्‍हणून १७ जागा कंत्राटी पद्धतीवर भरण्‍यासाठी पर्यटन खात्‍याने जाहिरात प्रसिद्ध केली.
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तालुका पातळीवर पुरुष पर्यवेक्षकांच्‍या दोन आणि पर्यटक वॉर्डन म्‍हणून १७ जागा कंत्राटी पद्धतीवर भरण्‍यासाठी पर्यटन खात्‍याने जाहिरात प्रसिद्ध केली असून, इच्छुकांना येत्‍या १२ सप्‍टेंबरच्‍या सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाटो–पणजी येथील पर्यटन भवनात अर्ज सादर करण्‍याची सूचना देण्‍यात आली आहे. या पदांचा कार्यकाळ एक वर्षासाठी असेल, असे जाहिरातीत स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

पर्यटन खात्‍यात पर्यवेक्षक आणि पर्यटन वॉर्डनच्‍या जागा काही दिवसांपासून रिक्त होत्‍या. या जागा कंत्राटी पद्धतीवर भरण्‍याचे निश्‍चित करून खात्‍याने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

पर्यवेक्षक आणि वॉर्डन या दोन्‍ही पदांवर पुरुषांची नेमणूक करण्‍यात येणार असून, त्‍यांना प्रति महिना प्रत्‍येकी २४ हजार रुपये वेतन देण्‍यात येणार असल्‍याचे जाहिरात नमूद करण्‍यात आले आहे.

Goa Government Job
Goa Water Metro: गोव्यातील 'वॉटर मेट्रो'ला मिळणार केंद्राचे सहकार्य, 25 ऑक्टोबरपूर्वी सर्वेक्षण

दरम्‍यान, पर्यवेक्षकासाठी पदवीपर्यंतचे शिक्षण, कोकणी, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांचे ज्ञान अनिवार्य असेल. तर, वॉर्डनसाठी उच्च माध्‍यमिकपर्यंत शिक्षण आणि कोकणी, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांचे ज्ञान अनिवार्य असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com