Vijay Sardesai: शहरी नक्षलवादी कोण जाहीर करा...

Vijay Sardesai: रोहिंग्यांचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित
Vijai Sardesai Slams Goa Government
Vijai Sardesai Slams Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai: राज्यात शहरी नक्षलवादी आहेत, या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचे पडसाद विरोधी आमदारांच्या बैठकीत आज उमटले. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे विधान हे सार्वत्रिक अशी भीती निर्माण करणारे आहे, असे नमूद केले.

Vijai Sardesai Slams Goa Government
Goa News: फोंड्यात भूमिगत वीजवाहिन्या जाळण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न

यामुळे सुरक्षित पर्यटनस्थळ या गोव्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असे सांगून त्यांनी आधीच पर्यटनाला उतरती कळा लागली असून अशा वक्तव्यामुळे पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली.

सरदेसाई म्हणाले, धोकादायक असे त्यांचे वक्तव्य आहे. त्यांना आपल्या विधानाचा काय परिणाम होणार हे समजलेले नाही. नक्षलवाद म्हणजे हिंसाचाराशी संबंध. त्यामुळे नक्षलवादी येथे आहेत असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हणण्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे ठरणार आहे. त्यांनी त्या पदावर असेपर्यंत संवेदनशीलपणे बोलले पाहिजे.

त्यांनी गोवा हे सुरक्षित पर्यटन स्थळ आहे, असे दर्शवणारी विधाने करायला हवीत. नववर्ष स्वागतावेळी पर्यटनाची उडालेली घसरगुंडी जाणवलेली आहे. त्यात आणखी घसरण होऊ नये, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे.

देशातील इतर राज्ये आणि आशियातील काही राष्ट्रे पर्यटन क्षेत्रात स्पर्धा करत असताना आम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे. राज्यात यापूर्वी कोकणी राजभाषेसाठी उग्र आंदोलन झाले, बसमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीसाठी मोठे आंदोलन झाले, पण आंदोलनकर्त्यांना कोणी नक्षलवादी संबोधले नव्हते. लोकशाहीत विचारभिन्नता असू शकते पण त्यासाठी विरोधी मत मांडणाऱ्यांना नक्षलवादी संबोधणे चूक आहे.

विरोधी पक्षनेते आलेमाव म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी संदिग्ध विधान करून संशय वाढवू नये. त्यानी शहरी नक्षलवादी कोण ते सांगितले हवे. तेच गृहमंत्री असल्याने असे कोणी राज्यात वावरत असल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारला कोणी रोखले आहे तेही सांगितल्यास उत्तम.

Vijai Sardesai Slams Goa Government
Goa Crime News: मालमत्तेच्या वादातून महिलेचा भोसकून खून

पर्यटन स्थळ असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने असे विधान केल्याने गोव्यात येण्यास इच्छुक असलेल्यांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. कोणीही फिरावयास जाण्याआधी तेथील सुरक्षिततेचा आढावा आपल्या परीने घेतात. मुख्यमंत्र्यांचे हे विधान देश विदेशात पोचले आहे. त्यामुळे पर्यटक संख्या रोडावण्याची शक्यता आहे. राज्य जातीय व धार्मिक सलोख्यासाठी ओळखले जाते. तो बिघडण्यास कारणीभूत ठरणारी वक्तव्ये काहीजण करत आहेत.त्यांच्यावर सरकार कारवाई न करता नक्षलवादी आहेत, असे सरकार म्हणते याला काय म्हणावे.

‘ते’ घाबरवत आहेत!

आमदार वीरेश बोरकर म्हणाले, राज्यात रोहिंगे, बांगलादेशी आहेत. त्या घुसखोरांवर कारवाई न करता सरकारला स्वतंत्र विचार मांडणाऱ्यांत नक्षलवादी दिसू लागले आहेत. आमदार क्रुझ सिल्वा म्हणाले, नक्षलवादाचा विषय काढून ते कोणाला तरी घाबरवत आहेत. त्यांनी नक्षलवादी कोण ते सांगावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com