गोव्यात विकासाच्या नावाखाली केलेले पक्षांतर हा राजकीय व्यभिचार आहे असे वक्तव्य गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई (Goa Forward MLA Vijay Sardesai) यांनी केले आहे. मते मिळवण्यासाठी देवाचा किंवा धर्माचा वापर करणे ही निवडणूक लढविण्याची भ्रष्ट पद्धत आहे. असा आरोप देखील सरदेसाई यांनी केला. आमदार सरदेसाई यांनी पक्षांतरासह सोनाली फोगाट प्रकरण (Sonali Phogat Case) तसेच, झुआरी बाबत आपली सडेसोड मते व्यक्त केली.
'गोमन्तक'ने (Gomantak) घेतलेल्या मुलाखतीत विजय सरदेसाई बोलत होते. आमदार सरदेसाई म्हणाले, 'काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच फरक राहिलेला नाही. आत्ताची भाजप पूर्वीची काँग्रेस झाली आहे. गोव्यातील पक्षांतराच्या घटनेनं देशासमोर वाईट उदाहरण ठेवले आहे. गोवा शिक्षण, दरडोई उत्पन्न याबाबत देशात पुढे आहे. पण, विकास आणि पक्षांतराच्या नावाखाली जो राजकीय व्याभिचार सुरू आहे तो राज्यातील जनतेसाठी धोकादायक आहे.' असे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) म्हणाले. राहूल गांधीनी (Rahul Gandhi) भाजप करत असलेल्या पैसा, सत्ता आणि मिडियाच्या गैरवापराच्या आरोपाचे देखील सरदेसाई यांनी समर्थन केले.
'आमदार निवडून आल्यानंतर ज्यांनी आमदारपदाची शपथ घेतली अशांनी, नंतर पक्षांतर केले तर त्याचा निर्णय न्यायालयाने घेतला पाहिजे. यासाठी प्रक्रिया सुरू करायला हवी,' असे विजय सरदेसाई यांनी मुलाखती दरम्यान नमूद केले.
आमदारांच्या पक्षांतरात राहुल गांधीचा काही दोष नाही
'काँग्रेस आमदारांनी केलेल्या पक्षांतरात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा काही दोष नाही. राहुल गांधी यांनी या आमदारांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. राहुल गांधी यांचा यात दोष असल्याचा समज निर्माण केला जात आहे, तो चुकीचा आहे. त्यांनी या काँग्रेस आमदारांवर खूप गुंतवणूक केली, ती या आठ आमदारांनी वाया घालवली. आमरदारांनी पैसे घेऊनच पक्षातर केले असून, ही त्यांची राजकीय आत्महत्या आहे.' असे विजय सरदेसाई म्हणाले.
दिगंबर कामत आणि लालु प्रसाद यादव
दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या 'देवाने पक्षांतर करण्याची परवानगी दिली' या वक्तव्याचा विजय सरदेसाई यांनी समाचार घेतला. सरदेसाई म्हणाले, 'दिगंबर कामत गोव्याचे मुख्यमंत्री राहिले असून, ते जेष्ठ नेते आहेत. पण, त्यांच्या या वक्तव्याने त्यांची प्रतिमा एकेकाळी लालु प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रतिमा होती तशी झाली आहे. दिगंबर कामत यांच्यावर आता मीम्स तयार व्हायला लागले आहेत. देवभूमी अशी ओळख असलेल्या गोव्याची प्रतिमा या पक्षांतरामुळे मलीन झाली आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.