Goa Water Supply: वालकिणीत लोक पितात उघड्या टाकीचे पाणी..!

Valkini: परिसरही अस्वच्छ तसेच, उघड्या टाकीत जमा होणारे पाणी लोकांना पुरविले जात आहे.
Water Tank
Water TankDainik Gomantak
Published on
Updated on

Valkini: वालकिणी वसाहत क्रमांक एकमधील नागरिकांसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाने बांधलेली टाकी पाहिल्यास या People drink open tank water in Valakini..! विभागाला कोणी मायबाप नसल्याचे दिसून येत आहे. उघड्या टाकीत जमा होणारे पाणी लोकांना पुरविले जात आहे.

सभोवतालचा परिसर पाहिल्यास पाणी खाते जनतेच्या आरोग्यासंदर्भात किती गांभीर्याने काम करते ते दिसून येते. साबांखाच्या पाणी विभागाच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

Water Tank
Goa Municipality: येत्या दहा दिवसांत बदलणार म्हापसा नगराध्यक्ष अन् उपनगराध्यक्ष!

पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाचा वरील भाग उघडाच आहे. टाकीला असलेले झाकण व्यवस्थित न लावता सताडपणे उघडेच सोडले आहे. त्यामुळे उघड्या टाकीत पक्षांमार्फत कोणतीही घाण पाण्यात टाकल्यास त्यात जीवजंतू निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवासी नवलो नाटोशे यांनी केली आहे.

पाणी खात्याने अशाप्रकारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. टाकीत पाणी साठवून ते जनतेला पुरविताना पाण्याच्या टाकीची स्वच्छता होते की नाही. तेथील परिसर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा या गोष्टींची पडताळणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Water Tank
Sanguem: सांगे आयआयटी प्रकल्प परिसरात 144 कलम लागू

नवलो नाटोशे, स्थानिक नागरिक-

टाकी साफ करण्यासाठी आतून जी लोखंडी शिडी बसविण्यात आली होती ती गंजून गेली आहे. त्या गंजलेल्या शिडीमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचण्याची अधिक भीती आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने पाण्याची टाकी कधी साफ केली की केवळ कागदावर साफ केली याची तपासणी करणे आवश्यक बनले आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनचा वापर केला जातो की नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com