Goa Crime News : खैराच्या झाडांच्या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्गातील संशयिताला अटक; सात संशयित फरार

चाळीस ओंडके केले जप्त
Accused allegedly felling kahir trees
Accused allegedly felling kahir treesDainik Gomantak
Published on
Updated on

Sindhudurg : सांगे तालुक्यात खैराच्या झाडांची तस्करी करताना वन अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह सिकंदर मालवणकर (रा. तळवडे, जि. सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अन्य सात संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

मात्र, वन खात्याने त्यांचा तपास सुरूच ठेवला आहे. सिकंदर मालवणकर याला आज, शनिवारी सांगे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्याला तीन दिवसांची कोठडी बजावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कामरखंड-सांगे येथील सर्व्हे क्रमांक ५/३ क्षेत्रातील खैर झाडांची बेकायदेशीर कत्तल करून तस्करी केली जात असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सांगे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली असता, आठजण खैर झाडांची तस्करी करताना आढळले.

Accused allegedly felling kahir trees
Margao Health Centre : मडगावात आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

याठिकाणी वन अधिकाऱ्यांनी छापा घातला असता, सिकंदर मालवणकर हा संशयित वन अधिकाऱ्यांच्या हाती लागला. उर्वरित सातजण तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सिकंदर याला तीन दिवसांची कोठडी बजावली असून १० तारखेला त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोठडीत त्याच्याकडून या रॅकेटसंदर्भात आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

कामरखंड-सांगे येथील वन खात्याच्या जंगलातील खैराच्या झाडांची बेसुमार कत्तल करण्यात येत होती. त्याचा सुगावा वन खात्याच्या अधिकाऱ्यांना लागला होता. त्यानुसार छापा टाकून वन अधिकाऱ्यांनी खैराच्या झाडाचे ४० ओंडके जप्त केले.

इतर सात आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले असले तरी वन खाते त्यांच्या मागावर आहे. लवकरच उर्वरित संशयितांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा सांगेचे वन अधिकारी विक्रमादित्य गावकर यांनी केला असून वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी प्रेमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनपाल मिंगेल फर्नांडिस यांनी आरोपी सिकंदर मालवणकर याला वन कायदा १९२७ चे कलम ५ नुसार अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Accused allegedly felling kahir trees
Goa News : विकासात गोवा अव्वल राज्य ठरेल; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा विश्वास

विड्याला रंगत

विड्याच्या पानामध्ये लाल रंग आणि विशिष्ट चव आणण्यासाठी जो कात वापरला जातो, तो कात खैराच्या झाडांपासून बनवला जातो. गोव्यालगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खैराच्या लाकडापासून कात बनवण्याचे व्यवसाय आहेत.

मात्र, त्यासाठी लागणारी झाडे मोठ्या प्रमाणात गोव्यात उपलब्ध असल्याने त्यांची बेसुमार तोड करून तस्करी केली जाते. ही बाब वन खात्याच्या लक्षात आल्यानंतर सापळा रचून ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com