Goa News : विकासात गोवा अव्वल राज्य ठरेल; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा विश्वास

साखळीत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
Suresh Prabhu Meet Cm Pramod Sawant
Suresh Prabhu Meet Cm Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Cm Pramod Sawant Meet Suresh Prabhu :गोव्यात सर्व क्षेत्रातील विकासाला वाव आहे. गोव्याची विकास क्षमता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी चांगले काम सुरू ठेवले आहे. सध्याचा विकासाचा आलेख पाहता गोवा हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होणार यात शंका नाही. विकास चांगला किंवा मोठा झाला, तरीही अजून काय गोष्टी करता येईल. कृषी क्षेत्रात व्यक्ती व कुटुंबाचा कसा विकास साधता येईल यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

गोव्यातही डेअरी, कुक्कुटपालन, शेती आहे. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. या माध्यमांतून शेतमालाला आणखीन किंमत कशी मिळवता येणार. प्रतीकात्मक विकास कसा करता येईल यावर चर्चा केली. सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

या सर्व विषयांवर गोव्याला व गोव्यातील शेतकरी समाजाला कशा प्रकारे वर आणता येणार याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरताच हा आराखडा तयार होणार आहे. प्रारंभी सदर आराखड्याची अंमलबजावणी साखळी भागात व नंतर संपूर्ण गोव्यात करून गोव्याला कृषी क्षेत्रात विकसनशील बनविण्याचे ध्येय आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक विचार ठेवला आहे.

Suresh Prabhu Meet Cm Pramod Sawant
Goa Illegal Tree Cutting: सांगेत खैराची 40 झाडे तोडली; महाराष्ट्रातील एकाला वनविभागाने घेतले ताब्यात

राज्याचा भौगोलिक विकास होत आहेच. त्यात कृषी क्षेत्रातील विविध माध्यमांतून व्यक्तीचा व कुटुंबांचा विकास कसा केला जाईल यावर जास्त भर दिला जाणार आहे,असेही माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले.

...राजकीय बदल!

राज्यात आपल्या पक्षासाठी काय लाभदायक ठरणार याप्रमाणे राजकीय बदल होत असतात. त्यातच आज संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व व व्यक्तित्वाला मान्यता दिली आहे. त्यामुळेच देशभरात राजकीय बदल दिसून येत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com