Margao Health Centre : मडगावात आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

आरोग्य केंद्रातील वैद्यकीय उपकरणे, फाईली, इतर कागदपत्रे यांचे नुकसान झाले नाही
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

Goa Monsoon 2023 : मडगाव शहरातील हॉस्पिसियो इस्पितळाजवळच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग पहाटे 3 च्या सुमारास कोसळला. सुदैवाने ही घटना केंद्र सुरू नसताना घडली. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा आरोग्य केंद्रातील कर्मचारी, तसेच रुग्णांच्या जीवावर बेतले असते.

मात्र, पहाटे कोसळलेल्या या इमारतीखाली एक वाहन सापडले. या घटनेचा विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे. संततधार पावसामुळे मडगावमध्ये पोर्तुगीजकालीन इमारतीत सुरू असलेल्या आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग शनिवारी पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास कोसळला.

मात्र, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय उपकरणे, फाईली, इतर कागदपत्रे यांचे नुकसान झाले नाही. केवळ इमारतीखाली पार्क करून ठेवलेल्या एका दुचाकीचे नुकसान झाले.

Goa Monsoon Update
Goa Monsoon 2023 : कोसळ‘धार’ बोथट; पण पडझड कायम, वादळी वारे सुसाट

मात्र, ही घटना दिवसा, कार्यालयीन वेळेत झाली असती तर काय झाले असते हे सांगता येण्यासारखे नाही. कारण दिवसभर या केंद्रामध्ये शेकडो रुग्ण वेगवेगळ्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी येतात. शिवाय डॉक्टर, परिचारिकांसह कर्मचारीही कामावर असतात.

वारसा स्थळांचे मूल्यांकन करा

मडगावातील आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग कोसळल्याने राज्यातील सर्व वारसा स्थळे, जुन्या इमारतींचे मूल्यांकन व संरचनात्मक लेखा परीक्षण करण्याची मागणी दक्षिण गोवा युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी केली आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून या इमारतींच्या देखभालीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. मडगावात अशा ३० ते ३५ इमारती आहेत, ज्या धोकादायक आहेत, असे नाडर म्हणाले.

Goa Monsoon Update
Goa News : विकासात गोवा अव्वल राज्य ठरेल; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा विश्वास

आरोग्य सुविधांचे ऑडिट करा

मडगावातील आरोग्य केंद्राच्या इमारतीची पडझड झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने राज्यातील सर्व आरोग्य सुविधांचे ऑडिट केले पाहिजे, अशी मागणी बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी केली आहे.

आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सरकारकडे त्यांच्या देखभालीसाठी व्यवस्था, योजना नाही. ते फक्त ब्रेकडाऊन मेन्टेनन्सचे काम करतात. आरोग्यमंत्री केवळ वक्तव्य करण्यात व्यस्त आहेत. कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

"या इमारतीची पाहणी करून नूतनीकरण करण्यात येईल. हे आरोग्य केंद्र दुसऱ्या स्थानी हलविण्याच्या सूचना आरोग्य संचालक गीता काकोडकर यांना केली आहे. ही इमारत ऐतिहासिक वास्तू असून तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे. जीएसआयडीसीमार्फत या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येईल."

- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com