Traditional Fishing: हंगामाच्या पहिल्या दिवशी केवळ 300 ट्रॉलर्सच समुद्रात गेले; डिझेल कर परतावा न मिळाल्याने मच्छिमारांत निरुत्साह

मासेमारी हंगाम चाचपडतच सुरू : डिझेलवरील कर परतावा न मिळाल्याने मच्छिमारांत निरुत्साह
Fishing
FishingDainik Gomantak
Published on
Updated on

Traditional Fishing राज्यातील यंदाचा मासेमारी हंगाम आजपासून जरा चाचपडतच सुरू झाला. राज्यभरातील आठशेहून अधिक ट्रॉलर्सपैकी केवळ ४०० ट्रॉलर्स मासेमारीसाठी सज्ज झाले आहेत, परंतु त्यापैकी केवळ ३०० ट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी गेले आहेत.

यंदा मासेमारी बंदी उठवण्याच्या काळात सोलर सुंगटे मोठ्या प्रमाणावर मिळाली नसल्याने मच्छीमारांत फारसा उत्साह नसल्याचेही सांगण्यात येते.

मच्छीमारांना गेली दोन वर्षे डिझेलवरील मूल्यवर्धित कराचा परतावा मिळालेला नाही. प्रत्येक मच्छीमारी ट्रॉलरमागे १२ रुपये ८७ पैसे प्रती लीटर असा परतावा त्यांना मिळत असे.

आता तर गेल्या नोव्हेंबरपासून परतावा मिळण्यासंदर्भात अधिसूचनाही सरकारने जारी केलेली नाही. त्यामुळे मासेमारी परवडत नसल्याने आपले ट्रॉलर मासेमारीसाठी सज्ज न करण्याचे ठरवले आहे.

Fishing
Sanguem Car Accident: सांगे कार अपघातातील तिसरा मृतदेहही सापडला

आठशेहून अधिक ट्रॉलर्सपैकी सुमारे तीनशे ट्रॉलर्स या कारणामुळेच बंद ठेवण्यात आल्याचे अखिल गोवा मासेमारी नौका मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. ते म्हणाले, मासेमारीचा व्यवसाय आता जास्त परतावा देणारा न ठरल्याने यंदा मासेमारीचा हंगाम सुरू झाला असला तरी अनेकजण त्यासाठी उत्सुक नाहीत.

Fishing
LLB Admission Scam: ‘कारे कायदा’ प्राचार्यांचे सुपुत्र 3 वरून थेट 63 व्या क्रमांकावर! पूर्वीच्या यादीत नसलेले 11 जण नव्या यादीत

मच्छीमारी ट्रॉलरवर काम करणारे कामगार गावी जाताना ट्रॉलरमालकांकडून उचल घेऊन जातात. त्यामुळे ट्रॉलरमालक त्या कामगारांच्या मोबाईलवर संपर्कात असतात. १ ऑगस्टपासून सरकारी पातळीवर मासेमारी बंदी उठत असली, तरी काहीजण पारंपरिकरीत्या नारळी पौर्णिमेपासून मासेमारीस सुरवात करतात.

त्यामुळे ते नारळीपौर्णिमेनंतरच गोव्यात परततील असेही त्यांनी सांगितले. मासेमारीचा हंगाम सुरू होण्याच्या आठवडाभर आधीच जाळी दुरुस्ती, ट्रॉलर्सची डागडुजी यासाठी धावपळ सुरू होते. यंदा त्यासाठी फारशी धावपळ दिसली नाही. त्यामुळेच यंदाचा मासेमारीचा हंगाम चाचपडतच सुरू होणार हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Fishing
Goa Assembly Monsoon Session: मणिपूरवरून विरोधकांचा पुन्‍हा रौद्रावतार, विधानसभेत चर्चेची मागणी

परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षाच

एका छोट्या ट्रॉलरवर एका फेऱीसाठी 6 ते 8 जण कामगार लागतात. मोठ्या ट्रॉलरवर 35-40 जण असतात. हे सारे कामगार बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यातून येतात. पावसाळ्यात ते गावी असतात आणि शेती करतात.

यंदा पावसाचे वेळापत्रक बदलल्याने त्यांचे गोव्यात येण्याचे वेळापत्रकही बदलले आहे. ते आता 15 ऑगस्टनंतरच गोव्यात येतील, अखिल गोवा मासेमारी नौका मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com