Goa Assembly Monsoon Session: मणिपूरवरून विरोधकांचा पुन्‍हा रौद्रावतार, विधानसभेत चर्चेची मागणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अखेर आश्‍वासन
Goa Assembly Monsoon Session 2023
Goa Assembly Monsoon Session 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session मणिपूरच्या विषयावरून विधानसभेत गदारोळ घालणाऱ्या व काल निलंबित झालेल्या सात विरोधी आमदारांनी आज निलंबनाची मुदत संपल्यानंतर पुन्हा विधानसभेत त्याच विषयावरील चर्चेची मागणी लावून धरली.

आमदार विजय सरदेसाई वगळता सहा विरोधी आमदार आज पुन्हा सभापतींसमोरील हौदात उतरले व मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी सरदेसाई यांनी मांडलेल्या मुद्यांवरून अखेर हा विषय चर्चेला घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले.

Goa Assembly Monsoon Session 2023
Mauvin Godinho: ‘गोंयचो पात्रांव’अंतर्गत तरुणांना 100 टॅक्‍सी; दुबई, सिंगापूरला होणार प्रशिक्षण

विरोधी आमदार आज पुन्हा काळे कपडे परिधान करून आले होते. काल कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्‍टा, कार्लोस फेरेरा, आरजीचे आमदार वीरेश बोरकर, ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस व क्रुझ सिल्वा तसेच गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचा समावेश होता.

सभापती रमेश तवडकर यांनी काल नियम २८९ अन्वये या सात आमदारांवर दोन दिवसांच्या निलंबनाची कारवाई केली होती. सायंकाळी विधानसभा कामकाजावेळी सभापतींनी ही कारवाई शिथिल करीत ती २४ तासांवर आणली.

Goa Assembly Monsoon Session 2023
Sanguem Car Accident: सांगे कार अपघातातील तिसरा मृतदेहही सापडला

यावेळी युरी आलेमाव हे खूपच आक्रमक झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अनवधनाने असंसदीय शब्द उच्चारला गेला. त्यास मुख्यमंत्री सावंत यांनी आक्षेप घेत तो शब्द मागे घेण्यास सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी चर्चेचे आश्‍वासन दिले, परंतु ती कधी करणार हे सांगितले नाही.

Goa Assembly Monsoon Session 2023
LLB Admission Scam: ‘कारे कायदा’ प्राचार्यांचे सुपुत्र 3 वरून थेट 63 व्या क्रमांकावर! पूर्वीच्या यादीत नसलेले 11 जण नव्या यादीत

सभागृहात येताच विरोधक आक्रमक

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता सातही विरोधी आमदार सभागृहात पोहोचले. सभागृहात येताच त्यांनी मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. सहाजण व्हेलकडे निघाले, त्यांना मार्शलनी अडविले.

आमदार सरदेसाई मात्र आपल्या आसनाकडेच होते. त्यांनी सर्वांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरच्या विषयावरून केंद्र आणि मणिपूर सरकारला फटकारले आहे, त्याविषयी सांगितले. त्यामुळे मणिपूरच्‍या विषयावर चर्चा होणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com