MLA Antonio Vaz: कुठ्ठाळीतील पाणी समस्या सोडवणार

पाणी समस्येबाबत तक्रारी येऊ लागल्याने आमदार वाझ यांनी घेतला आढावा
 MLA Antonio Vaz
MLA Antonio VazDainik Gomantak

वास्को: कुठ्ठाळी किंवा केळशी कोमुनिदादने पाण्याची टाकी बांधण्यासाठी सुमारे एक हजार चौरस मीटरचा भूखंड दिल्यास कुठ्ठाळी भागातील पाण्याची समस्या दूर मोठी मदत होणार असल्याचे कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वाझ यांनी सांगितले. कुठ्ठाळी भागातील पाणी समस्या सोडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(Cortalim MLA Antonio Vaz promised to solve the water problem )

पाणी समस्येबाबत तक्रारी येऊ लागल्याने आमदार वाझ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यासह बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी कुठ्ठाळीच्या जिल्हा पंचायत सदस्य मर्सियना बाझ, कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, अभियंते विश्वभर भेड़े आदी. उपस्थित होते.

 MLA Antonio Vaz
Pernem Crime: अमली पदार्थ प्रकरणात एकाला 11 वर्षांनंतर सश्रम कारावास

गावातील घरांची संख्या वाढत आहे. काही घरे उंच भागात असल्याने तेथे पाणीपुरवठा होत नाही. यासंबंधी चर्चा करण्यात आली. पाणी साठविण्यासाठी अतिरिक्त टाकी बांधल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार वाझ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तेथे एक टाकी विनावापर आहे. तिची दुरुस्ती करून ती कार्यान्वित करण्याची त्यांनी सूचना केली. त्याचप्रमाणे अतिरिक्त जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव आहे. त्यासंबंधीचा अहवाल आपणास द्या, आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिले.

 MLA Antonio Vaz
Goa Rain: येत्या दोन दिवसात राज्यात हलक्या सरींची शक्यता

कुठ्ठाळीसाठी 10 एलएमडी पाणी मंजूर केले असताना फक्त तीन एलएमडी पाणी मिळते. त्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होत आहे, असे सरपंच परेरा यांनी सांगितले. पाणी साठविणारी नवीन टाकी बांधण्यात आली, तर समस्या दूर होण्यास मदत होईल. उंच भागातील घरांना पाणी पुरवठा कसा होईल यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे, असे अभियंता भेंडे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com