'PFI'ला पैसे पुरवण्याच्या आरोपाखाली फातोर्ड्यातील एकावर गुन्हा दाखल

कर्नाटक येथील वित्त अधिकाऱ्याने केली तक्रार
arrest
arrestDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यासह देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय ) संघटनेवर देशविघातक कृत्य करत असल्याचा ठपका ठेवत या संघटनेचे समर्थक, कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. या पार्श्वभूमीवर फातोर्डा येथील अल्ताफ शाह सय्यद याच्याविरुद्ध पीएफआयला वित्तपुरवठा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(goa police registered an FIR against one Altaf Shah Sayad from Fatorda under the unlawful activities act )

मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने कर्नाटक येथील आयकर अधिकारी अमित शिंदे यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार फातोर्डा येथील अल्ताफ शाह सय्यद याच्याविरुद्ध राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत काळा पैसा निर्माण करणे, लाँडरिंग करणे, प्रस्थापित व्यवस्था मोडीत काढणे, सार्वजनिक सुव्यवस्था सुरक्षेला धोका निर्माण करणे, तसेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)ला गुप्तपणे वित्तपुरवठा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

arrest
Pernem Crime: अमली पदार्थ प्रकरणात एकाला 11 वर्षांनंतर सश्रम कारावास

सरकारी कर्तव्ये पार पाडताना अडथळा आणणे

बेकायदेशीर कृती कायद्यासोबत पोलिसांनी सय्यदवर सरकारी कर्तव्ये पार पाडताना अडथळा आणणे आणि पुरावे नष्ट केल्याबद्दलही गुन्हा नोंदवला आहे. नोंदवलेल्या तक्रारीत आरोपीने बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असल्याने त्याने PFI ला गुप्तपणे वित्तपुरवठा केला आहे असल्याचं म्हटलं आहे.

arrest
Goa Rain: येत्या दोन दिवसात राज्यात हलक्या सरींची शक्यता

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत काळा पैसा निर्माण करणे

आरोपीसह त्याच्या साथीदारांवर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत काळा पैसा निर्माण करणे, सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षेला धोका निर्माण करणे तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केले असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असुन काही व्यक्तींंना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com