Pilerne Fire: आगीचे स्वरूप भीषण; अडीच किलोमीटर परिसरातील लोकांचे स्थलांतर

Goa: मुख्यमंत्री- आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश; त्रास जाणवल्यास रुग्णालय गाठा
Pillerene Fire
Pillerene FireDainik Gomantak

Pilerne Fire: घटनास्थळी आढावा घेताना मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंग बिष्णोई, जिल्हाधिकारी मामू हागे, पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, आमदार केदार नाईक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आपत्कालीन आणि सतर्कतेचे उपाय म्हणून म्हापसा जिल्हा रुग्णालयासह परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णवाहिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आगीचे भीषण स्वरूप आणि आगीतून निर्माण होणारे धुराचे लोट, कार्बन डस्ट पाहता पहाटेपर्यंत आग आटोक्यात येईल.

अग्निशमन आणि आपत्कालीन यंत्रणेच्या अधिकारी, जवानांसह प्रशासकीय यंत्रणा, पोलिस, नौदल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आग विझविताना घातक वायू तयार होत असल्याने अडीच किलोमीटर परिसरात राहणाऱ्या आणि श्वसनाचे आजार असलेल्या लोकांचे स्थलांतर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

Pillerene Fire
Mahadayi Water Dispute: म्हादई लढा ठरेल आगळा वेगळा!

याशिवाय गोमेकॉ, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर्स, आरोग्यतज्ज्ञ, खासगी डॉक्टर्स आणि रुग्णवाहिकांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

आजूबाजूच्या भागातील हवेची आणि प्रदूषणाची गुणवत्ता आणि इतर बाबींचे निरीक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून जागोजागी उपकरणे लावली आहेत. ज्यांना अस्वस्थ वाटत असेल, त्यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला

Pillerene Fire
Pillerene Fire: बर्जर पेंट कंपनीचे गोदाम खाक; गोव्याच्या इतिहासातील भीषण आग

घातक कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती: या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग विझवताना कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होत आहे. हा वायू मानवी जीवितास घातक आहे. याचा त्रास होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ही आग विझवताना कार्बन मोनॉक्साईडसारखे घातक वायू तयार होत आहेत. हा वायू मानवी जीवनास घातक आहे. त्यामुळे सध्या तयार होणारा वायू किती धोकादायक आहे, हे पाहण्यासाठी राज्य प्रदूषण मंडळाने विविध प्रकारची उपकरणे घटनास्थळी लावली आहेत. सध्या तरी आग आणि धुराचे लोट आकाशात जात असल्याने हा वायू नागरी वस्तीत पसरत नाही.

- महेश पाटील, अध्यक्ष, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com