Goa Fest 2023: प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका दिव्या कुमार आणि असीस कौर यांच्या स्वर्गीय सुरांनी आज ‘गोवा-फेस्ट’च्या दुसऱ्या दिवशीच्या महत्त्वपूर्ण सत्राची सुरूवात झाली.
‘फ्युचर ऑफ कनेक्टेड डिव्हाइसेस अँड क्रॉस चॅनल मेजरमेंट’ या विषयावर आयोजित पहिल्या सत्रात गीत लुल्ला-विक्रीचे व्हीपी आणि एशिया पॅसिफिक-कॉमस्कोर यांच्यासमवेत चर्चा केली.
पंकज कृष्णा (संस्थापक आणि सीईओ क्रोम डीएम) आणि सलील कुमार (सीईओ - आयटीजीडी तज्ज्ञ) यांची उपस्थिती होती. इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
गीत लुल्ला यांनी सांगितले की, क्रॉस चॅनल मेजरमेंट एका अखंड दृष्टिकोनाकडून खंडित दृष्टिकोनाकडे जात आहे, ज्याची वारंवार तक्रार करणे आवश्यक आहे.
कारण डेटा स्वतःच अर्थहीन आहे, डेटाला संदर्भ आवश्यक आहेत. पंकज यांनी विविध घटकांच्या व्याप्तीबद्दल विचार मांडले.
ब्राऊझर (223 दशलक्ष), मोबाइल उपकरणे (619 दशलक्ष) आणि कनेक्टेड टीव्ही (22.1 दशलक्ष) हे तीन घटक सर्वांत महत्त्वाचे आहेत.
हे आकडे यापूर्वी कधीच उघड झाले नव्हते. सलील यांनी देखील डेटाची उपलब्धता व उत्पन्न यावर भर दिला. नंतर, डिस्ने स्टारने ‘द इव्हॉल्व्हिंग इकॉनॉमी अँड द फ्युचर ऑफ स्टार्टअप्स’ या विषयावर ज्ञानपरिसंवाद झाला.
त्यात राजन आनंदन (व्यवस्थापकीय संचालक-सेक्वॉइया कॅपिटल अँड सर्ज) यांच्याशी मुक्त पत्रकार अनुराधा सेनगुप्ता यानी संवाद साधला.
अर्थव्यवस्थेच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. अंतिम सत्रात मेडिसन वर्ल्डचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सॅम बलसारा यांच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ‘मीडिया प्लॅनिंग’ने सुरू होणारे दोन मास्टर क्लास पाहायला मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.