मोरजी : मांद्रे मतदारसंघातील लोकांना ह्या शवागाराचा उपयोग व्हावा हा हेतू आहे. कित्येकदा निधनानंतर नातेवाईक मंडळी (Relative congregation) येण्यास अवकाश असतो, त्यावेळी शव ठेवण्यासाठी शवागराचा उपयोग होत असतो. अनेकदा म्हापसा व अन्य ठिकाणाहून शवपेटी आणणे जिकिरीचे असते तसेच बरेच खर्चिक असल्याने सामान्य कुटुंबाना (Normal family) आर्थिक आधार देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मगोचे नेते जित आरोलकर यांनी सांगितले. दोन्ही शवागारे मतदारसंघात मध्यवर्ती अश्या, मांद्रे व पार्से गांवात ठेवण्यात येईल त्यासाठी हिंदू-ख्रिश्चन बांधव (Hindu-Christian brothers) गरजूनी आपल्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मगोचे नेते जित आरोलकर यांनी केले. फा ज्योवितो यांनी जो कमी बोलतो, त्याचे ऐकले जाते असे सांगितले, त्यानुसार आपण कमी बोलेन, परंतु मांद्रे मतदार संघासाठी भरपूर जास्त कार्य करेन अशी हमी देतो, असे उद्योजक तथा मगोचे नेते आरोलकर यांनी सांगितले.
मांद्रेचे पंच आंबरोज फर्नांडिस यांनी मगोचे नेते जित आरोलकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. मगो नेते जित आरोलकर यानी,कोविडच्या काळात तपासणी सुविधा तसेच हॉटेल भाडेपट्टीवर घेऊन विलगिकरण सोय केली,मांद्रेतील विध्यार्थ्यांना मोफत वाय-फाय सेवा,जन्म-मृत्यू दाखले,एक चौदा उतारे व अन्य सरकारी अर्जसुविधा मोफत उपलब्ध केली होती त्याचा फायदा मांद्रेतील नागरिकांना झाल्याचे पंच आंबरोज यांनी सांगितले.यावेळी उदघाटक हरमलचे चर्च फा. रोलँड फेर्नांडिस यांनी जित आरोलकर याना शुभेच्छा दिल्या व लोकांसाठी जमेल तितके कार्य चालूच ठेव, देवाकडून निश्चित असे तितके कार्य चालूच ठेव, देवाकडून निश्चित आशिर्वाद मिळतील असे व्यक्त केले.
यावेळी हरमल चर्चचे सहाययक फा ज्योवितो, मांद्रे चर्चचे फा.जुझे गोम्स,मोरजी फा. फ्रान्सिस, हरमलचे पंच प्रवीण वायंगणकर,गुणाजी ठाकूर,मांद्रेच्या पंच सेराफीना फेर्नांडिस, डॉ फ्रान्सिस फेर्नांडिस (मांद्रे)उपस्थित होते.आथिया फेर्नांडिस, सबिया फेर्नांडिस, डॅनियल फेर्नांडिस, मायकेल डिसौझा,सांतांन फेर्नांडिस व डॉमनिक अल्फान्सो यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.स्वागत व आभार पंच आंबरोज फेर्नांडिस यांनी मानले.यावेळी प्रमुख उपस्थितांत मांद्रेचे माजी पंच सदस्य दुमिंग फेर्नांडिस,समाजकार्यकर्ते लुईस फेर्नांडिस,हरमलचे बोस्को फेर्नांडिस,पीटर फेर्नांडिस आदी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.