Goa Stray Dog Attack: मामाच्या घरी आलेल्या 2 वर्षीय बालिकेचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू; स्थानिक संतप्त

Ponda News: राज्यात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त असताना घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचा लाट उसळली आहे.
Toddler killed by stray dogs
Stray DogsRef Image
Published on
Updated on

फोंडा: मामाच्या घरी आलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रक्तबंबाळ झालेल्या या चिमुकलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. बोणबाग-बेतोडा येथे आज (शुक्रवारी, १८ एप्रिल) पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षीय चिमुकली आईसह बोणबाग-बेतोडा येथे मामाच्या घरी आली होती. शुक्रवारी सकाळी चिमुकली खेळता खेळता रस्त्यावर गेली याचवेळी काही भटक्या कुत्र्यांनी तिला लक्ष्य करत हल्ला केला. यामध्ये चिमुकली पूर्णत: जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या लहान मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास केला जात आहे.

Toddler killed by stray dogs
Baichung Bhutia: 'मुलांनी मोबाईल फोन बाजूला ठेवून खेळायला हवे', भारतीय फुटबॉलच्या प्रगतीवरती भुतियांनी मांडले ऱोखठोक मत

राज्यात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त असताना घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचा लाट उसळली आहे. हणजूण येथे सात वर्षीय मुलाचा पिटबुल जातीच्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना गेल्यावर्षी उघडकीस आली होती. तसेच, समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांना देखील अनेक भटकी कुत्रे टार्गेट करत असतात. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपया योजना करण्याची मागणी वारंवार केली जाते.

भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रवाचा मुद्दा विधानसभेत देखील पोहोचला होता. कुत्रे पर्यटकांना निशाना करतात त्यामुळे पर्यटनाला देखील फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, राज्यात पिटबुल आणि रॉटवायलर यासारख्या आक्रमक जातींच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांचा समस्येवर ठोस उपाय गरजेचा असल्याचे मत नागरिक व्यक्त करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com