Goa Drug Case: दिल्ली, गोवा विमानतळावरील तपास यंत्रणेला ड्रग्ज तस्करांनी गंडवलं; थायलंडमधून आले होते 43 कोटींचे कोकेन

Drug Case: गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातील निंबू विन्सेंट या पश्चिम बंगालच्या व्यक्तीला रंगेहात अटक केली. त्यानंतर वाडेकर या सडा येथील दाम्पत्याला अटक करण्यात आली.
Goa Drug Case
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात काही दिवसांपूर्वी आजवरजी सर्वात मोठी कारवाई करत, तब्बल ४३ कोटी रुपये किंमतीचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी गोवा पोलिसांचे कौतुक केले खरे पण, या प्रकरणी आता विमानतळावरील तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. थालंडमधून आणलेले कोकेन दिल्ली आणि गोवा विमानतळावरील तपास यंत्रणेतून सुटले कसे असा सवाल उपस्थित होत आहे.

सीमाशुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) यासह इतर एजन्सीज् अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी देशभरातील विमानतळांवर सक्रिय आहेत.

"थायलंडमधून गोव्यात अमली पदार्थ आणल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रवासात दोन विमानतळवरील (दिल्ली आणि गोवा) तपास यंत्रणेच्या हा अमली पदार्थ निदर्शनास येऊ शकला नाही", अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे.

Goa Drug Case
Goa Stray Dog Attack: मामाच्या घरी आलेल्या 2 वर्षीय बालिकेचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू; स्थानिक संतप्त

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ (कोकेन) याची किंमत डिआरआयनुसार ठरविण्यात आली आहे. पण, याचे बाजारमूल्य वेगळे असू शकते. अटकेतील संशयित तपासात सहकार्य करत नसल्याचे गुप्ता म्हणाले.

तीन संशयित राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने येत असल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी चिकोळणा, मुरगाव येथे शोध मोहिम राबवत एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातील निंबू विन्सेंट या पश्चिम बंगालच्या व्यक्तीला रंगेहात अटक केली. त्यानंतर रेश्मा वाडेकर आणि मंगेश वाडेकर या सडा येथील दाम्पत्याला अटक करण्यात आली.

Goa Drug Case
Goa Crime: घात की अपघात? वास्कोत रेल्वे रुळानजीक आढळला अनोळखी इसमचा मृतदेह

संशयित मंगेश वास्को येथील स्मशानभूमीत काम करतो. कथित बलात्कारप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच, त्याच्या पत्नीला मानव तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. निंबू विन्सेंटची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही मात्र, त्याचा वापर अमली पदार्थ वितरित करण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून केला जात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com