
Underground power lines in Goa
पणजी: गोवा सरकारने राज्यातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित आणि स्थिर करण्यासाठी ओव्हरहेड वीजप्रणाली भूमिगत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या कामांसाठी एकूण ११३०.६७ कोटींचा खर्च अपेक्षित असून, हे परिवर्तन पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह आणि उच्च प्रतीचा होणार आहे, अशी माहिती अभिभाषणादरम्यान राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी दिली.
शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत बिजली योजने’अंतर्गत २४५ लाभार्थ्यांना एकूण २.३३ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. गोवा सरकारने १०० टक्के नूतनीकरणीय ऊर्जा प्राप्त करण्याच्या उद्देशाने ‘गोय विनामूल्य वीज योजना, २०२४’ सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत गेल्या एका वर्षात प्रतिमहिना ४०० युनिट्स किंवा त्याहून कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ५ किलोवॅट क्षमतेच्या मोफत सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहेत. हे यंत्र बसवलेल्या ग्राहकांकडून विजेचे कोणतेही बिल आकारण्यात येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यात जून २०२५ पर्यंत १० मेगावॅट घरगुती सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना’ आणि राज्यातील विद्यमान योजनांचा समन्वय साधून हे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. या योजनेसाठी अनुदान ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर दिले जाणार आहे. गोवा वीज विभागाने राज्यातील घरगुती सौरऊर्जा ग्राहकांसाठी १० वर्षांसाठी वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.