पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) निकालात 40 पैकी 20 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत. गोवा निवडणुकीत असे तब्बल 10 मतदारसंघ ठरले जिथे उमेदवार 76 ते 716 मतांच्या दरम्यान विजयी ठरले. निवडणूक आयोगाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गोव्यात 14 फेब्रुवारी 2022 रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले, ज्याचे निकाल 10 मार्च 2022 रोजी आले.
भाजप नेते 76 मतांनी पराभूत झाले
1. उत्तर गोव्यातील सांत आंद्रे मतदारसंघात सर्वात कमी 76 मतांनी विजय नोंदवला गेला. या जागेवर आरजीपीने भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा 76 मतांनी पराभू केल. या लढतीत आरजीपीचे उमेदवार वीरेश बोरकर विजयी झाले.
2. फोंडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे रवी नाईक आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) डॉ केतन भाटीकर यांच्यात चुरशीची लढत झाली. सुरुवातीच्या निकालात डॉ.भाटीकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते, मात्र मतमोजणी संपल्यानंतर संपूर्ण चित्र उलटले. भाजपचे रवी नाईक (Ravi Naik) यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 77 मते अधिक मिळवून निवडणूक जिंकली. काँग्रेस नेत्याने ही जागा 169 मतांनी गमावली.
3. दक्षिण गोव्यातील वेळ्ळी मतदारसंघातही निकराची लढत पाहायला मिळाली. या जागेवर आम आदमी पार्टीचे (AAP) उमेदवार क्रुझ सिल्वा यांनी सॅवियो डी सिल्वा यांचा 169 मतांनी पराभव केला.
4. दक्षिण गोव्यातील प्रियोळ मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोविंद गावडे यांनी MGP अध्यक्ष आणि पक्षाचे उमेदवार दीपक ढवळीकर यांचा अवघ्या 213 मतांनी पराभव केला.
प्रमोद सावंत यांचाही कमी साखळी मतदार संघातून मतांनी विजय झाला. विजयाच्या कमी फरकाबाबत बोलताना प्रमोद सावंत यांनी नंतर सांगितले की ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे आणि ते यावर आत्मपरीक्षण करतील.
6. पणजी मतदारसंघात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र, भाजपचे उमेदवार मोन्सेरात आणि अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्यात निकराची लढत पाहायला मिळाली. भाजपचे उमेदवार मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांच्यावर अवघ्या 716 मतांनी विजय मिळवला. पणजीतून भाजपने (BJP) तिकीट नाकारल्यानंतर पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
या जागांही सोप्या नव्हत्या
7. डिचोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणेकर यांचा अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्टी यांच्याकडून 318 मतांनी पराभव झाला. मात्र, विजयानंतर शेट्टी यांनी लगेचच भाजपला पाठिंबा दिला.
8. दक्षिण गोव्यातील कुडचरे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमित पाटकर यांच्या विरोधात ऊर्जामंत्री आणि भाजपचे उमेदवार नीलेश काब्राल यांनी 672 मतांनी विजय मिळवला आहे.
9. दोन नवीन चेहरे आरोलकर (MGP) आणि उल्हास तुयेकर यांनी देखील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर कमी फरकाने विजय नोंदवला आहे. आरोलकर यांनी मांद्रे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांचा 715 मतांनी पराभव केला.
10. उल्हास तुयेकर यांनी नवीलीम मतदारसंघात तृणमूल काँग्रेस (TMC) उमेदवार वालांका आलेमाओ यांचा 430 मतांनी पराभव केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.