Goa Election: दिदींच्या धमाक्याला सुरुवात, फालेरोंचा आज तृणमूलमध्ये प्रवेश

फालेरो (Luisin Falero) यांची निवड काँग्रेस (Congress) निवडणूक समितीच्या प्रमुखपदी केल्यानंतरही गिरीश चोडणकर (Girish Chodankar) व दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या गटाने त्यांच्याविरुद्ध उचापती केल्या. त्यामुळे दुखावलेल्या फालेरो यांच्या समर्थकांनी गेले काही दिवस या दुक्कलीच्या विरोधात जोरदार हल्लाबोल चालविला आहे.
तृणमूल काँग्रेस गोव्यात उद्या सोमवारी प्रचंड मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराला निकट असलेले लुईझिन फालेरो (Luisin Falero) उद्या आपल्या मोठ्या समर्थक गटासह तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करतील.
तृणमूल काँग्रेस गोव्यात उद्या सोमवारी प्रचंड मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराला निकट असलेले लुईझिन फालेरो (Luisin Falero) उद्या आपल्या मोठ्या समर्थक गटासह तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करतील. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पश्चिम बंगालचा (West Bengal) झंझावात असलेल्या ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस गोव्यात आज सोमवारी प्रचंड मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून काँग्रेसमध्ये (Congress) मोठी फूट पडणार असल्याचे आज स्पष्ट झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराला निकट असलेले लुईझिन फालेरो (Luisin Falero) आज आपल्या मोठ्या समर्थक गटासह तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करतील. आज (ता. 27) फालेरो यांनी हॉटेल मेरियॉटमध्ये पत्रकार परिषद बोलावली असून याच ठिकाणी तृणमूलचे खासदार डेरिक ओब्रायन यांचा डेरा आहे.

तृणमूल काँग्रेस गोव्यात उद्या सोमवारी प्रचंड मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराला निकट असलेले लुईझिन फालेरो (Luisin Falero) उद्या आपल्या मोठ्या समर्थक गटासह तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करतील.
Goa: 'काँग्रेस बरोबरील युतीची बोलणी गोवा फॉरवर्डकडून तूर्तास बंदच'

फालेरो यांच्या पक्षप्रवेशाच्या पत्रकार परिषदेची माहिती तृणमूलशी संबंधित असलेली निवडणूकविषयक संस्था- आय पॅककडूनच पत्रकारांना देण्यात आल्याने फालेरोंच्या या वृत्ताला दुजोराच मिळाला. सत्ताधारी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांनेही ‘गोमन्तक’शी बोलताना काँग्रेस पक्षाच्या फुटीसंदर्भात सुतोवाच केले. तृणमूल काँग्रेस हे काँग्रेसबरोबरच इतर पक्षांनाही धक्का देण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव तसेच इतर काही ज्येष्ठ नेते त्यांच्या गळाला लागल्याची विश्वसनीय माहिती आहे.

तृणमूल काँग्रेस गोव्यात उद्या सोमवारी प्रचंड मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराला निकट असलेले लुईझिन फालेरो (Luisin Falero) उद्या आपल्या मोठ्या समर्थक गटासह तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करतील.
Goa Assembly Elections: ‘गोंयाक जाय दीदी’

ज्येष्ठ नेते गोव्यात; घोषणेकडे लक्ष

आज रात्री तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नते गोव्यात दाखल झाले असून देशातील प्रमुख राजनितीतज्ज्ञ आणि ‘आय पॅक’चे प्रमुख प्रशांत किशोर यांचाही त्यात समावेश आहे. त्यांनी यापूर्वीच सोमवारी आपण गोव्यात धमाका करणार असल्याचे जाहीर केले आहे.

प्रशांत किशोर गेल्या आठवड्यात केवळ एका दिवसासाठी गोव्यात आले होते. त्यावेळी ते लुईझिन फालेरो यांच्यासह राज्यातील एकूणच सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटले. फालेरो यांना त्यांनी राज्यसभा सदस्यत्व देण्याचे कबुल केले आहे. या वार्तेमुळे दिल्लीमध्ये खळबळ माजली व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या घटनेची दखल घेत सावध पाऊले टाकली होती. तरीही फालेरो यांनी आपला पवित्रा न सोडता काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय कायम ठेवला.

फालेरो समर्थकांवर पक्ष सोडण्याचा सतत दबाव

‘काँग्रेस पक्ष संपूर्ण देशात हवालदिल बनला आहे. राहुल गांधी नेतृत्वाची कोणतीही कमाल दाखवू शकलेले नाहीत. देशात भाजपचा विजय थांबविण्याचे धारिष्ट्य काँग्रेसमध्ये राहिलेले नाही या निष्कर्षांवर गोव्यातील फालेरो समर्थकांचा गट आला आहे. दुसऱ्या बाजुला गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला येथेही कोणती धमक दाखवता आलेली नाही. हा पक्ष येत्या निवडणुकीपूर्वीच शस्त्रे म्यान करून बसण्यासारखी परिस्थिती असल्याने फालेरो समर्थकांवर पक्ष सोडण्याचा सतत दबाव येत होता. त्यात त्यांना तृणमूलचा पर्याय उपलब्ध झाला’, अशी प्रतिक्रिया फालेरोंचे एका निकटच्या सहकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

तृणमूल काँग्रेस गोव्यात उद्या सोमवारी प्रचंड मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराला निकट असलेले लुईझिन फालेरो (Luisin Falero) उद्या आपल्या मोठ्या समर्थक गटासह तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करतील.
Goa Election 2022: सर्वच्या सर्व जागा लढवून जिंकण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्धार

फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर काय...

फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष गलितगात्र होईल, अशा प्रतिक्रिया राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केल्या. सध्या गोव्यातील ख्रिस्ती मतदारांमध्येही काँग्रेसविरोधात वैफल्याची भावना आहे. काँग्रेसचे आमदार जिंकून येऊन भाजपात सामील होतात. त्यामुळे हा पक्ष भगव्या विचारसरणीच्या विरोधात प्रखर झुंज देण्यास निकामी ठरला आहे अशी सासष्टीतही सार्वत्रिक भावना आहे.

फालेरो समर्थकांचा जोरदार हल्लाबोल

फालेरो यांची निवड काँग्रेस निवडणूक समितीच्या प्रमुखपदी केल्यानंतरही गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांच्या गटाने त्यांच्याविरुद्ध उचापती केल्या. त्यामुळे दुखावलेल्या फालेरो यांच्या समर्थकांनी गेले काही दिवस या दुक्कलीच्या विरोधात जोरदार हल्लाबोल चालविला आहे. दुसऱ्या बाजुला फालेरोंसारख्या म्हाताऱ्यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेसला त्याचा फायदाच होईल, अशा प्रतिक्रिया गिरीश चोडणकर यांच्या समर्थकांनी जाहीरपणे द्यायला सुरवात केली आहे. फालेरो यांच्या सोबत काँग्रेस संघटनेतील ज्येष्ठ नेते उद्या राजीनामा देण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेस पक्षसंघटनेत फालेरो गटाचे प्रभुत्व आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com