Goa: 'काँग्रेस बरोबरील युतीची बोलणी गोवा फॉरवर्डकडून तूर्तास बंदच'

काँग्रेसला (Congress) त्यात सामील व्हायचे आहे की नाही ते त्यांनी स्पष्ट करावे जेणेकरून लोकांनाही काँग्रेसच्या मनात काय आहे ते कळेल असे ते म्हणाले.
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

मडगाव: काँग्रेस पक्षाने (Congress) गोव्यात (Goa) सध्या आपल्याला युतीच्या बोलण्यात रस नाही असे धोरण स्वीकारलेले असताना आम्हीही त्यांच्याशी या बाबत बोलणे तूर्तास पुर्णपणे स्थगित ठेवले आहे अशी भूमिका या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी आज स्पष्ट केली. त्यांना जर युतीबद्दल जर त्यांना बोलायचे नसेल तर आम्हालाही त्यांच्याशी बोलायची इच्छा नाही. तरीही अशी युती व्हावी अशी सर्वसाधारण जनतेची मागणी आहे. आम्ही इतर समविचारी शक्तींना एकत्र आणून लोकांना जे काय हवे ते देण्याचा प्रयत्न करू काँग्रेसला त्यात सामील व्हायचे आहे की नाही ते त्यांनी स्पष्ट करावे जेणेकरून लोकांनाही काँग्रेसच्या मनात काय आहे ते कळेल असे ते म्हणाले.

Vijay Sardesai
Goa Election: 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील लोकांसाठी राखीव, केजरीवाल

काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी वास्को येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत काँग्रेसला सध्या युती करण्यात स्वारस्य नाही. गरज वाटल्यास हा निर्णय मागाहून घेऊ असे म्हटले होते. त्याला उत्तर देण्यासाठी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय सरदेसाई यांनी, भाजपाचे गोव्यातील रावणराज्य नष्ट करण्यासाठी येत्या दसऱ्यापर्यंत सर्व शक्ती एकत्र होणार आहेत. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्हला 2022 ची निवडणूक लढवायची आहे. ज्यांना 2027 ची निवडणूक लढवायची असेल त्यांनी आपले निर्णय सावकाशीने घ्यावेत असा टोमणा त्यांनी काँग्रेसवर हाणला.

सध्या काँग्रेस पक्षात प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या तीन तीन जणांना काँग्रेस आपल्या पक्षात प्रवेश देत आहे ते पाहिल्यास आगामी निवडणुकीत काँग्रेस बाकीच्यांशी युती करण्याचे सोडा स्वतः ते आपल्या कार्यकर्त्यांशी तरी युती करू शकतील का हा खरा प्रश्न आहे असे सरदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com